Amy Jackson Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amy Jackson Birthday: ब्रिटिश मॉडेल असतानाही ३ भारतीय भाषांच्या चित्रपटांमध्ये काम, एमी जॅक्सनचा थक्क करणारा फिल्मी प्रवास

Amy Jackson Bday Special: एमी जॅक्सनचा फिल्मी प्रवास खूपच खडतड होता. ब्रिटिश मॉडेल असलेल्या एमीने भारतामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून कशी ओळख मिळवली हे आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेणार आहोत...

Priya More

Amy Jackson Movie:

बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री एमी जॅक्सन (Amy Jackson) सध्या या नाही तर त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहते. एमी जॅक्सनने नुकताच लाँग टाइम बॉयफ्रेंड एड वेस्टविकसोबत गुपचूप साखरपुडा करेला. तिच्या एंगेजमेंटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 31 जानेवारीला एमी जॅक्सन तिचा 31 वा वाढदिवस (Amy Jackson Birthday) साजरा करणार आहे. एमी जॅक्सनचा फिल्मी प्रवास खूपच खडतड होता. ब्रिटिश मॉडेल असलेल्या एमीने भारतामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून कशी ओळख मिळवली हे आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेणार आहोत...

वयाच्या १६ व्या वर्षी मॉडेलिंगमध्ये करिअरची सुरुवात करणारी ब्रिटिश मॉडेल एमी जॅक्सनने अनेक टायटल जिंकून जगात नाव कमावले आहे. साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यापासून ते बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारपर्यंत अनेक सुपरस्टारसोबत एमीने काम केले आहे. ब्रिटीश असली तरी देखील एमीने भारतामधील तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट करून आपले टॅलेंट दाखवले आहे.

एमी जॅक्सन 31 जानेवारी 1991 ला झाला. अगदी कमी वयामध्येच एमी जॅक्सनने तिच्या स्वप्नांकडे उड्डाण केले. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. एमीने 2009 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी मिस टीन वर्ल्ड कॉम्पेटिशनचा किताब जिंकला. यानंतर तिने 2010 मध्ये मिस लिव्हरपूलचा किताबही जिंकला. मिस लिव्हरपूल या खिताबाने एमी जॅक्सनसाठी फिल्मी दुनियेची दारे उघडली. या कार्यक्रमादरम्यान तेलुगू चित्रपट दिग्दर्शक ए. एल विजयही तेथे उपस्थित होते. ए.एल. विजयने एमीला आपल्या चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे एमी जॅक्सनला भारतीय चित्रपटसृष्टीत एन्ट्री करण्याची संधी मिळाली आणि तिच्या हाती पहिला चित्रपट आला.

ब्रिटिश मॉडेल एमी जॅक्सनने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात तमिळ चित्रपटातून केली होती. एमीने तिच्या कामाची सुरुवात 'मद्रासपट्टिनम' या चित्रपटातून केली होती. तामिळ चित्रपटानंतर एमीने बॉलिवूडमध्ये देखील एन्ट्री केली. एमीचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'एक दिवाना था' हा आहे. या चित्रपटात एमीसोबत प्रतीक बब्बरने मुख्य भूमिका साकारली होती. प्रतिक बब्बर आणि एमी जॅक्सन यांचा हा चित्रपट रोमँटिक ड्रामा होता. तामिळ आणि हिंदी चित्रपटानंतर एमी जॅक्सनने तेलुगू चित्रपटसृष्टीतही काम केले. एमी जॅक्सनने बॉलीवूड अभिनेता कुमार अक्षय कुमारसोबतही चित्रपटामध्ये काम केले आहे. एमीने अक्षय कुमारसोबत 'सिंग इज ब्लिंग'मध्ये काम केले आहे. याशिवाय एमीने सुपरस्टार रजनीकांतसोबत '2.0' या चित्रपटात काम केले आहे.

दरम्यान, एमी जॅक्सन तिच्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत राहते. तिने नुकताच एड वेस्टिविकसोबत एंगेजमेंट केली. एड वेस्टविकच्या आधी एमी जॅक्सनने बिजनेसमन जॉर्ज पानायियोटोला डेट केले आहे. या दोघांची एंगेजमेंट देखील झाली होती. एंगेजमेंटनंतर एमीने काही महिन्यामध्येच म्हणजेच 19 सप्टेंबर 2019 ला मुलाला जन्म दिला होता. पण काही कारणास्तव एमीचा जॉर्जसोबत ब्रेकअप झाला. आता एऐमी एड वेस्टविकला डेट करत असून त्याच्यासोबत तिने 29 जानेवारीला एंगेजमेंट केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT