Shaitaan Movie New Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shaitaan Movie: 'शैतान'मधील अजय देवगण- आर माधवनचे खरतनाक पोस्टर आऊट, या दिवशी ट्रेलर होणार रिलीज

Shaitaan Movie New Poster: अजय देवगण आणि आर माधवन यांच्या नव्या लूकमधील हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांचाही खतरनाक लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत.

Priya More

Ajay Devgn Shaitaan Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'शैतान'मुळे (Shaitaan Movie) चर्चेत आहे. अजय देवगण 'शैतान' या सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी या चित्रपटाचे आणखी एक दमदार पोस्टर रिलीज केले आहे. अजय देवगण आणि आर माधवन यांच्या नव्या लूकमधील हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांचाही खतरनाक लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत.

अजय देवगण शैतान चित्रपटाने शत्रूशी लढताना दिसणार नाही. तर तो या चित्रपटामध्ये शैतानी शक्ती आणि काळा जादूविरोधात लढताना दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर आणि नवनवीन पोस्ट पाहून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. नुकताच निर्मात्यांनी या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करत ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच २२ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. अजय देवगण फिल्म्स आणि पनोरमा बॅनरखाली तयार होणाऱ्या शैतान चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहलने केले आहे.

नुकताच रिलीज झालेल्या शैतानच्या नव्या पोस्टरमध्ये आर माधवनचा आणि अजय देवगणचा अर्धा-अर्धा चेहरा दिसत आहे. आर माधवनचा निळा डोळा आणि त्याच्या चेहऱ्यावरील जखमा पाहून कुणालाही भिती वाटेल. आर माधवनचा हा खतरनाक अवतारामधील पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंधारावर राज्य करणारा आर माधवन या चित्रपटात अजय देवगणला टक्कर देताना दिसणार आहे. आर माधवन या चित्रपटामध्ये शैतानची भूमिका साकारणार आहे.

शैतानच्या नव्या पोस्टवरवरून दिसून येत आहे की, हा चित्रपट थ्रिलर, सस्पेंस आणि काळीजादूवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणसोबत साऊथची अभिनेत्री ज्योतिका मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट येत्या ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. विकास बहलने 'शैतान' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जादूटोणा, सस्पेन्स आणि गडद जगावर आधारित हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT