aditya Singh Rajput Saam TV
मनोरंजन बातम्या

Aditya Singh Rajput Death : अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू, बाथरुममध्ये संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

Aditya Singh Rajput Found Dead : सूत्रांच्या माहितीनुसार आदित्यचा मृत्यू ड्रग्जचा ओव्हरडोसमुळे झालेला असून शकतो.

साम टिव्ही ब्युरो

Aditya Singh Rajput : प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी अंधेरी येथील त्याच्या घरात तो बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला आहे. आदित्यच्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, आदित्यच्या मित्राने सर्वात आधी आदित्यला बाथरुमध्ये पाहिलं. त्यानंतर त्याच्या मित्राने इमारतीच्या चौकीदाराच्या मदतीने आदित्यला रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टरांना आदित्यला मृत घोषित केले. सूत्रांच्या माहितीनुसार आदित्यचा मृत्यू ड्रग्जचा ओव्हरडोसमुळे झालेला असून शकतो.

काल रात्रीच इन्स्टाग्रामवर पोस्ट

आदित्य सिंग राजपूत हा दिल्लीचा रहिवासी होता. त्याने काल रात्रीच इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, या फोटोंवरुन तो मृत्यूच्या काही तास आधी पार्टी करत होता असं दिसून येत आहे. आदित्यच्या अचानक निधनामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आदित्यचा मृत्यू झालाय यावर कुणालाही विश्वास ठेवणे कठीण जात आहे. (Latest Entertainment News)

आदित्यची कारकीर्द

आदित्य 300 हून अधिक जाहिरात व्हिडीओंमध्ये दिसला होता. Splitsvilla या रिअॅलिटी शोमध्येही तो दिसला होता. मैंने गांधी को नही मारा आणि क्रांतिवीर यांसारख्या चित्रपटात त्याने काम केलं होतं. त्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. (Latest News Update)

आदित्यने 'गंदी बात' या वेबसीरीजमध्येही काम केलं आहे. सध्या आदित्य एका प्रॉडक्शन हाऊससोबत काम करत होता. कास्टिंग डायरेक्टरचं काम करत असल्याने मुंबईच्या ग्लॅमर दुनियेत आदित्यचं मोठं नाव होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना एका दिवसाची परवानगी

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : पुण्यातील मानाचे पाचही गणपती बाप्पा विराजमान

Gadchiroli News : ऐन गणेशोत्सवात पोलिसांची मोठी कारवाई; ४ नक्षलवाद्यांचा खात्मा

Yawal News : यावलमध्ये लाखोंचा गांजा जप्त; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Abhijeet Khandkekar: अभिजीत खांडकेकरच्या नाशिकच्या घरी बाप्पा विराजमान|VIDEO

SCROLL FOR NEXT