Tamannaah Bhatia-Vijay Varma Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tamannaah Bhatia-Vijay Varma: तमन्ना भाटिया लवकरच बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत करणार लग्न?, चर्चा होण्यामागचं कारणही आलं समोर

Tamannaah Bhatia-Vijay Varma Wedding: तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. हे कपल लग्नाचे प्लॅनिंग करत असल्याचे सांगितले जात आहे.

Priya More

Tamannaah Bhatia-Vijay Varma Marriage:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) या कपलची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. सध्या हे बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असलेले कपल आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या डेटिंगच्या बातम्यांनंतर दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. पण या कपलने अद्याप आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली नाही. हे कपल सोशल मीडियावर देखील एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात.

अलीकडेच तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा अनेक दिवाळी पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले. आता या सगळ्यानंतर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. हे कपल लग्नाचे प्लॅनिंग करत असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चा होण्यामागचे कारण देखील समोर आलं आहे.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अशामध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी लग्न करावे असे त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. ते या कपलच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच एक मीडिया रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लग्नाबाबत अपडेट समोर आले आहेत. तमन्ना आणि विजयचे कुटु्ंबींय लग्नासाठी दोघांनाही प्रेशराइज करत असल्याची माहिती समोर आली आहे.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लग्नाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. तेलुगु वनच्या वृत्तानुसार, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लग्नाबाबत खूप गंभीर आहेत. आता ते त्यांच्या नात्याला नवे वळण देण्याचा विचार करत आहेत. बातमीनुसार, तमन्ना भाटियाचे वय ३० पेक्षा जास्त आहे. त्यामुळे तिचे कुटुंबीय तिच्यावर लग्नासाठी खूप दबाव टाकत आहेत. तर लग्नासाठी विजयवर देखील कुटुंबीयांकडून दबाव टाकला जात आहे.

ही माहिती समोर आल्यानंतर तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचे चाहते खूपच खूश झाले आहेत. तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचे चाहते या दोघांच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशामध्ये आता तमन्ना आणि विजय लग्न करणार असल्याचे कळताच सर्वांना आनंद झाला आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील फेमस कपल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्यांच दिवसांपासून सुरू आहेत. पण जेव्हा या दोघांनी 'लस्ट स्टोरीज 2' या वेबसीरिजमध्ये एकत्र काम केले तेव्हा त्यांच्या नात्याच्या अधिकच चर्चा रंगल्या. 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी एकत्र अनेक बोल्ड सीन्स दिले होते. ज्यांची खूप चर्चा झाली होती. या वेबसीरिजनंतर तमन्ना आणि विजय अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले. ऐवढेच नाही तर दोघेही सोशल मीडियावर एकत्र रोमँटिंक फोटो शेअर करताना दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT