Saam tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha Bought New Flat: सोनाक्षी सिन्हाने खरेदी केलं आलिशान घर, किंमत ऐकून व्हाल चकीत

Bollywood Actress Sonakshi Sinha: सोनाक्षीने समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या आलिशान बिल्डिंगमध्ये हे घर खरेदी (Sonakshi Sinha Bought New Flat) केलं आहे.

Priya More

Sonakshi Sinha New House:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Actress Sonakshi Sinha) नेहमीच आपल्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत असते. यावेळी सोनाक्षी सिन्हा पुन्हा चर्चेत आली आहे. त्यामागचे कारण म्हणजे सोनाक्षीने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. सोनाक्षीने समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या आलिशान बिल्डिंगमध्ये हे घर खरेदी (Sonakshi Sinha Bought New Flat) केलं आहे. या घराची किंमत ऐकून तिचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.

सोनाक्षी सिन्हाने मुंबईतल्या वांद्रे परिसरामध्ये हायराइज बिल्डिंगमध्ये आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. सोनाक्षीचे हे नवं घर २६ व्या मजल्यावर आहे. तिच्या घरातून समुद्र स्पष्टपणे दिसतो. सोनाक्षीच्या घराची किंमत ११ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. सोनाक्षीने याचवर्षी मे महिन्यामध्ये एक लग्झरी अपार्टमेंट खरेदी केले होते. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यावर तिने कॅप्शनमध्ये 'घर बनवणं सोपं नाही' असं लिहिलं होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी सिन्हाने २२०८.७७ स्क्वेअर फूटचा फ्लॅट खरेदी केला आहे. जो वांद्रेच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये तिने हे घर घेतलं आहे. सोनाक्षी सिन्हाचा नवीन फ्लॅट लक्झरींनी भरलेला आहे. ज्यामध्ये चार वाहनांसाठी पार्किंगची जागा देखील आहे. सोनाक्षी सिन्हाने ऑगस्ट २०२३ मध्ये तिच्या नवीन फ्लॅटची नोंदणी केली आहे. यासाठी अभिनेत्रीने ५५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी दिली होती.

सोनाक्षी सिन्हाने तिच्या नवीन घराबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. पण काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती पॅक केलेल्या सोफा सेटसोबत उभी असलेली पोज देताना दिसली होती. दरम्यान, सोनाक्षी सिन्हाने सलमान खानच्या 'दबंग' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'दबंग'नंतर सोनाक्षी 'राउडी राठोड', 'आर...राजकुमार', 'लुटेरा', 'सन ऑफ सरदार', 'अॅक्शन जॅक्सन', 'अकिरा', 'दबंग 3', 'मिशन मंगल' आणि 'डबल एक्सएल' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोनाक्षी सिन्हा शेवटची अॅमेझॉन प्राइमच्या रोअर सीरिजमध्ये दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT