संपूर्ण देशवासियांसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. आज अयोध्येच्या (Ayodhya) राम मंदिरामध्ये (Ram Mandir) श्रीराम विराजमान झाले. यामुळे संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वजण रामभक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत. ठिकाठिकाणी मिरवणूका काढण्यात आल्या, राम मंदिरामध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
अशामध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये (Siddhivinayak Mandir) जाऊन दर्शन घेतले. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिल्पा शेट्टीने बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जमिनीवर माथा टेकला खरा पण त्यापूर्वी तिने असं काही कृत्य केले ज्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.
शिल्पा शेट्टीने आज फक्त सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेतले नाही तर तिने यावेळी जय श्रीरामचा जयघोष करत हातामध्ये भगवा झेंडा घेतला. यावेळी तिच्यामध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला. शिल्पा शेट्टीने त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन घेत मंदिरात माथा टेकत आशीर्वाद घेतला. पण यावेळी तिने माथा जमिनीवर टेकवण्यापूर्वी आपल्या साडीचा पदर पाघरला. त्यानंतर तिने आपला माथा जमिनीवर टेकवला. आता याच कारणामुळे शिल्पा शेट्टीला ट्रोल केले जात आहे.
शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स त्यावर जोरदार कमेंट्स करत तिला ट्रोल करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'ती स्वतःची साडी समोर ठेवून डोकं टेकवत आहे... हे लोकं देवाची भक्ती करणार आहेत...' दुसऱ्या युजरने लिहिले, 'स्वच्छता महत्त्वाची आहे.' त्यासोबत त्याने हसणारा इमोजीही कमेंटमध्ये टाकला आहे. तर काहींनी 'माथा टेकण्यासाठी ही स्वच्छ जागा पाहिजे तर मग मंदिरात का गेली?', असा सवाल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.