Richa Chadha And Ali Fazal Wedding Documentary Saam Tv
मनोरंजन बातम्या

RiAlity Teaser: 'प्यार पूरा नहीं लेकिन पर्याप्त होता है', रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नाची 'रिअ‍ॅलिटी'

Richa Chadha And Ali Fazal Wedding Documentary: रिचा आणि अली यांच्या लग्नावर आधारित डॉक्युमेंटरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रिअ‍ॅलिटी' असं या डॉक्युमेंटरीचे नाव असणार आहे.

Priya More

Richa Chadha And Ali Fazal Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अभिनेता अली फजल (Ali Fazal) यांनी गेल्या वर्षी लग्न केले. लग्नाच्या एका वर्षानंतर रिचा आणि अलीने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. हे कपल आता त्यांच्या पुशिंग बटन स्टुडिओ बॅनरसह निर्माते झाले आहेत. रिचा चड्ढा आणि अली फजलचे लग्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

रिचा आणि अली यांच्या लग्नावर आधारित डॉक्युमेंटरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रिअ‍ॅलिटी' असं या डॉक्युमेंटरीचे नाव असणार आहे. नुकताच रिचा आणि अलीने आपल्या लग्नाच्या डॉक्युमेंटरीचा टीझर लाँच केला. ज्यामध्ये केवळ लग्नाचा दिवसच नाही तर संपूर्ण तयारी आणि दिल्ली, मुंबई आणि लखनऊ येथे त्यांच्या लग्नानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमातील खास क्षण दाखवण्यात आले आहेत.

राहुल सिंग दत्ता दिग्दर्शित 'रिअ‍ॅलिटी' ही लग्नाची डॉक्युमेंटरी फक्त रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या लग्नावर आधारित नसून अली आणि रिचाच्या जवळच्या लोकांच्या दृष्टीकोनातून लग्नाच्या दिवसापूर्वी पडद्यामागील गोंधळ देखील दाखवला जाणार आहे. त्यांचे लग्न मागच्या वर्षी देशभरात कडक कोविड प्रोटोकॉल दरम्यान झाले होते. टीझरमध्ये त्यांच्या लग्नामधील अनेक BTS क्षण पाहायला मिळत आहेत.

रिचा चड्ढा म्हणाली, 'लग्न अनेकदा परीकथा म्हणून दाखवले जातात, पण ते खऱ्या भावनांचे मिश्रण असते - आनंद, चिंता, उत्साह आणि मधल्या प्रत्येक गोष्टीचे. आमचा डॉक्युमेंटरी 'रिअ‍ॅलिटी' हा आमच्या लग्नाचे सार टिपण्याचा प्रयत्न आहे. आमचे लग्न म्हणजे प्रत्येक कल्पनेच्या धाग्यांनी विणलेली टेपेस्ट्री होती. ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न 'रिअ‍ॅलिटी' आहे. हा ग्लॅमरच्या मागे वास्तव दाखवणारा आरसा आहे. ज्यामध्ये दोन लोकं दाखवले आहेत.

अली फजलने सांगितले की, 'आम्ही आमच्या भावना, संघर्ष आणि पूर्ण नियोजन करून मिळवलेला विजय दाखवत आहोत. रियालिटी हा पुरावा आहे की प्रेम नेहमीच पूर्ण नसते, परंतु ते नेहमीच पुरेसे असते. प्रेम खोल आहे, ते गोंधळलेले आहे आणि तरीही ते जग बदलणारे आहे. 'रिअ‍ॅलिटी' आमच्या प्रवासाचे काही सार कॅप्चर करते. फक्त अभिनेता म्हणूनच नाही तर दोन प्रेमात पडलेल्या व्यक्ती म्हणूनही. आम्हाला त्‍याची झलक फक्त आमच्‍या माध्‍यमातूनच नाही तर सभोवतालच्‍या लोकांच्‍या नजरेतून द्यायची होती.'

रिचा आणि अली यांनी या डॉक्युमेंटरीचे नाव त्यांच्या स्वतःच्या नावांसारखेच ठेवले आहे. ऋचापासून 'री' तयार करण्यात आले आणि अली फजलकडून 'अली' घेऊन 'रियालिटी' हे नाव तयार करण्यात आले आहे. अली फजलच्या वाढदिवसाच्या एका दिवसानंतर म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी रिचाने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. पुलकित सम्राट आणि दिया मिर्झा यांच्यासह अनेक स्टार्सनी रिचाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 2020 मध्ये कायदेशीर विवाह केल्यानंतर या स्टार जोडप्याने 2022 मध्ये त्यांच्या लग्नाची पार्टी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT