Saam tv
मनोरंजन बातम्या

Rhea Chakraborty: तुरुंगातील ते २८ दिवस कसे होतो?, इतर कैद्यांनी कशी दिली वागणूक...; ३ वर्षांनंतर रिया चक्रवर्तीने केला खुलासा

Priya More

Rhea Chakraborty Shared Jail Experience:

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर त्याची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी रियाला तुरुंगातही जावे लागले होते. रियाला २८ दिवसांनंतर जामीन मिळाला. तुरुंगातील ते २८ दिवस रिया चक्रवर्तीसाठी खूपच वाईट होते.

आता ३ वर्षानंतर रियाने तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातील अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. रियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून तुरुंगात राहणे माझ्यासाठी खूप भीतीदायक असल्याचे म्हटले आहे. पण तुरुंगामध्ये असे काही लोक होते ज्यांच्याकडून मला खूप प्रेम मिळाले असे तिने सांगितले. रिया चक्रवर्तीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत रियाने २०२० मध्ये तुरुंगात असतानाचे तिचे अनुभव शेअर केले आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला तब्बल २८ दिवस तुरुंगात राहावे लागले होते. सुशांतसाठी ती ड्रग्ज विकत घेत होती असे आरोप रियावर करण्यात आले होते. त्याचवेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी सुशांतच्या मृत्यूला देखील रिया चक्रवर्तीच जबाबदार असल्याचा आरोपही केला होता.

रियाने सांगितले की, तुरुंगात तुमची ओळख फक्त एका नंबरवरून होते, जो तुम्हाला दिला जातो. समाजाने तुम्हाला नाकारले म्हणून तुम्ही तुरुंगात आहात. मी तुरुंगात गेले तेव्हा मी एक अंडर-ट्रायल कैदी होतो आणि योगायोगाने माझ्यासारख्या अनेक महिला होत्या ज्यांना शिक्षा झाली नव्हती. पण त्यांना बघून आणि बोलून मला एक वेगळंच प्रेम मिळालं. कारण मला छोट्या छोट्या गोष्टीत प्रेम मिळायचे.कधी कधी त्यांची भाषा मला विचित्र वाटायची. पण त्यांना पाहिल्यावर मला कळले की जीवन स्वर्ग किंवा नरक बनवणे फक्त तुमची निवड आहे. परिस्थिती कशीही असो. कधीकधी ही लढाई लढणे कठीण होते, परंतु जर तुमच्यात ताकद असेल तर सर्वकाही सोपे होते.'

रियाने पुढे सांगितले की, 'तुरुंगात असताना या महिलांशी बोलताना मला खूप काही शिकायला मिळाले. या महिला छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिकल्या होत्या.या महिलांना रविवारी रात्रीच्या जेवणासाठी समोसे मिळतील किंवा कोणीतरी त्यांच्यासाठी नाचत असेल या गोष्टीचा आनंदही दिसला. आनंदाचे क्षण कसे शोधायचे आणि ते कसे धरून ठेवायचे हे या महिलांना माहीत होते.'

रियाच्या म्हणण्यानुसार, 'मी तुरुंगात जगातील सर्वात आनंदी व्यक्तींना भेटले पण अर्थातच तुरुंगात घालवलेला वेळ माझ्यासाठी नरकासारखा होता.' दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रिया चक्रवर्ती बरेच महिने सिनेसृष्टीपासून दूर होती. पण त्यानंतर तिने टीव्ही रिअॅलिटी शो रोडीजद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wheat Bugs : गव्हासह डब्ब्यात 'या' गोष्टी मिक्स केल्यास लागणार नाहीत किडे

PM Narendra Modi : मोदींचा महाराष्ट्र दौरा; वर्ध्यातून संबोधित करणार

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT