Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakul Preet आणि Jackky Bhagnani गोव्याच्या 'या' आलिशान हॉटेलमध्ये करणार लग्न, एका खोलीचं भाडं ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

Rakul Preet And Jackky Bhagnani Grand Wedding In Goa: कुल प्रीत गोव्यातील आलिशान हॉटेलमध्ये लग्न करणार आहे. एका रात्रीसाठी किती खर्च येतो आणि काय सुविधा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत...

Priya More

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आता अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग यांचे लग्न 21 फेब्रुवारीला गोव्यात होणार आहे. फक्त मित्र परिवार आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हे कपल लग्न करणार आहे. रकुलच्या लग्नाबाबत एक-एक अपडेट्स जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. रकुल प्रीत गोव्यातील आलिशान हॉटेलमध्ये लग्न करणार आहे. एका रात्रीसाठी किती खर्च येतो आणि काय सुविधा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत...

जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग यांच्या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. कालपासून त्याच्या लग्नापूर्वीच्या विधीला देखील सुरूवात झाली आहे. गोव्यामध्ये रकुल प्रीत आणि जॅकीच्या लग्नाचे कार्यक्रम तीन दिवस आधीपासूनच चालणार आहेत. त्यानंतर २१ फेब्रुवारीला ते लग्न करणार आहेत. या बॉलिवूड कपलचे डेस्टिनेशन वेडिंग गोव्यात होणार असून त्यांच्या ग्रँड वेडिंगसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. रकुल आणि जॅकी ज्या आलिशान हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत, त्या हॉटेलच्या भाड्याशी संबंधित तपशील समोर आला आहे.

रकुल प्रीत आणि जॅकी यांचे लग्न आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचे लग्न 21 फेब्रुवारीला होणार आहे. या लग्नाला दोघांचे जवळचे मित्र आणि नातेवाईकच उपस्थित राहणार आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ते त्यांच्या लग्नाचे सर्व विधी दक्षिण गोव्यातील ITC ग्रँड हॉटेलमध्ये करणार आहेत. हे हॉटेल 45 एकरमध्ये पसरलेले आहे. या हॉटेलमध्ये सुमारे 246 खोल्या असून एका रात्रीचे भाडे सुमारे 20 हजार रुपये आहे.

रकुल प्रीत आणि जॅकी इको-फ्रेंडली लग्न करणार आहेत. यासोबतच एका लक्झरी रिसॉर्ट स्वीटचे भाडे सुमारे ९१ हजार रुपये आहे. या हॉटेलमधून तुम्ही समुद्राचा नजारा पाहण्याचा आनंद घेऊ शकता. रकुल आणि जॅकी बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि त्यांच्या नात्याला लाइमलाइटपासून दूर ठेवतात. हे कपल सुरुवातीला भारतापासून दूर म्हणजे बाहेरच्या देशामध्ये कुठेतरी लग्न करणार होते. पण पीएम मोदींनी भारतात लग्नाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी लग्नासाठी गोव्याची निवड केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुख्यात गुंड निलेश घायवळच्या गाडीवर पोलिसांचा फास; उसाच्या शेतातून कार जप्त|VIDEO

Maharashtra Live News Update : बंजारा समाज आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरणार

Lung Cancer Symptoms: फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं हाता-पायांवर सर्वात आधी दिसतात? तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण माहिती

Virar Tourism : विरारमध्ये लपलंय एक सुंदर लोकेशन, जे पाहताच तुम्ही कुल्लू मनाली विसराल

Baklava Recipe: बिग बॉस फेम तान्या मित्तलला आवडणार बकलावा कसा करायचा घरी, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT