बॉलिवूडची (Bollywood) 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) ५ महिन्यांनंतर मायदेशी आली आहे. निक जोनाससोबत (Nick Jonas) लग्न केल्यानंतर प्रियंका चोप्रा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहते. प्रियंका चोप्रा १४ मार्चला मुलगी मालती मेरी जोनास चोप्रासोबत मुंबईत आली. त्यानंतर आता प्रियंका आणि मालतीला भेटण्यासाठी तिचा पती निक देखील भारतामध्ये आला.
आज प्रियंका चोप्रा पती निक जोनास आणि मालतीसोबत अयोध्येमध्ये पोहचली. प्रियंकाने कुटुंबासोबत राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. सध्या प्रियंकाचा कुटुंबासोबतचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वेळी प्रियंका, निक आणि मालती पारंपारिक लूकमध्ये दिसले.
सोशल मीडियावर प्रियंका चोप्राचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये प्रियांका आणि निक जोनास मुलगी मालतीसोबत अयोध्या विमानतळावर दाखल झाल्याचे दिसत आहे. अयोध्येला पोहोचल्यानंतर प्रियांका आणि निकने थेट राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी प्रियंकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. निक जोनास देखील पारंपारिक लूकमध्ये दिसला त्याने कुर्ता-पायजामा घाला होता.
प्रियंकाने राम मंदिरामध्ये जाऊन कुटुंबासोबत रामलल्लाचे दर्शन घेतले. प्रियंका चोप्राचा देसी लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे. यावेळी प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांचे मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले. मंदिर प्रशासनाकडून दोघांच्याही गळ्यामध्ये भगव्या रंगाची शाल देण्यात आली. यावेळी प्रियांकाला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अभिनेत्रीच्या भारतामध्ये आल्यानंतर राम मंदिरामध्ये सहकुटुंब दर्शन घेतलं. तिच्या या निर्णयाचे चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे.
एका यूजरने लिहिले की, 'प्रियांका ही खरी सनातनी आहे. भारतात आल्यानंतर त्यांनी रामजींना पाहिले आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'ज्यांनी निमंत्रण मिळूनही राम मंदिर प्राण प्रतिष्ठामध्ये भाग घेतला नाही त्यांच्या तोंडावर ही चापट आहे.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'प्रियांकासारखे होणे खूप कठीण आहे. प्रत्येकजण तिच्यासारखे काम करू शकत नाही.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.