Priyanka Chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra: प्रियंका चोप्राचा थाटच वेगळा, मायदेशी परताच 'देसी गर्ल'ने दाखवला जलवा; VIDEO व्हायरल

Priyanka Chopra In India: प्रियंकाची चुलत बहीण मीरा चोप्राचे नुकताच लग्न झाले. बहीणच्या लग्नानंतर प्रियंका भारतामध्ये आली. त्यामुळे बहिणीच्या लग्नाला हजेरी न लावता नंतर ती भारतामध्ये येण्यामागचे नक्की काय कारण असावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Priya More

Priyanka Chopra Video:

बॉलिवूडची (Bollywood) 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) गुरूवारी रात्री मायदेशी परतली. जवळपास ५ महिन्यांनंतर ती भारतामध्ये आली आहे. निक जोनाससोबत (Nick Jonas) लग्न केल्यानंतर प्रियंका चोप्रा लॉस एंजेलिसमध्ये राहते. नुकताच प्रियंका आपली मुलगी मालती मेरी जोनास चोप्रासोबत मुंबईत आली.

प्रियंकाची चुलत बहीण मीरा चोप्राचे नुकताच लग्न झाले. बहीणच्या लग्नानंतर प्रियंका भारतामध्ये आली. त्यामुळे बहिणीच्या लग्नाला हजेरी न लावता नंतर ती भारतामध्ये येण्यामागचे नक्की काय कारण असावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रियंका चोप्रा आणि मालतीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियंका चोप्रा आपल्या कामातून १० दिवसांचा ब्रेक घेऊन मुंबईत आली आहे. प्रियंका चोप्रा भारतामध्ये येताच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. प्रियंका मुंबईमध्ये इंटरनॅशनल ज्वेलरी ब्रँड्च्या उद्घाटनासाठी आली आहे. प्रियांका चोप्रा प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड बुल्गारीच्या मुंबई स्टोअरच्या उद्घाटनासाठी भारतात आली आहे. या ज्वेलरी ब्रँडने प्रियंका चोप्राला उद्घाटनासाठी स्पेशल गेस्ट म्हणून बोलावले होते. या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावत प्रियंका चोप्राने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

प्रियंका चोप्राने यावेळी व्हाइट कलरचा क्रॉप टॉप आणि गोल्डन कलरच्या पॅट परिधान केली होती. डीपनेक ड्रेसिंगमध्ये प्रियंका चोप्रा खूपच सुंदर दिसत होत. तिने केसाची पोनी, लाइट मेकअप, गळ्यात नेकलेस आणि हिल्स कॅरी करत लूक परिपूर्ण केला होता. प्रियंका चोप्राचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियंका चोप्राचा बोल्ड आणि ब्युटिफूल अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिच्या व्हायरल होणाऱ्यो फोटो आण व्हिडीओवर चाहते कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट्स करत लिहिले की, 'आमची देसी गर्ल आमच्या देशामध्ये परत आली.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'प्रियंका चोप्राचा थाटच वेगळा.' तिसऱ्या युजरने लिहिले की, ' वाह..तू खूपच सुंदर दिसत आहे.' तर आणखी एका युजरने लिहिले की, 'हिच खरी नॅशनल क्रश आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT