Parineeti And Raghav Sangeet Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti And Raghav Sangeet Video: परिणीती-राघवच्या संगीत सेरेमनीचा Inside Video व्हायरल, कपलने गाण्यावर धरला ठेका

Parineeti And Raghav Wedding: नुकताच परिणीती आणि राघवच्या संगीत सेरेमनीचा इनसाइड व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Priya More

Parineeti-Raghav Sangeet Ceremony:

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) आज विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दोघेही लग्नासाठी खूपच उत्सुक आहेत. उदयपूरच्या लीला पॅसेलमध्ये दुपारी १ वाजता राघव आणि परिणीतीच्या लग्नाच्या विधीली सुरूवात होणार आहे. लग्नापूर्वीच्या प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. अशामध्ये नुकताच परिणीती आणि राघवच्या संगीत सेरेमनीचा इनसाइड व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

परिणीती राघवच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गायक नवराज हंस लाइव्ह परफॉर्म करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये संपूर्ण आनंदाचे वातावरण असल्याचे दिसत आहे आणि व्हिडीओमध्ये नवराज 'दिल चोरी सदा हो गया' आणि 'गुड नाल इश्क मीठा' ही गाणी गाताना दिसत आहे. यावेळी सर्व पाहुणे खूप एन्जॉय करताना दिसत आहेत.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा संगीत सेरेमनी शनिवारी रात्री उशिरा पार पडला. या कपलच्या लग्नाच्या फंक्शन्सशी संबंधित फोटो पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. सध्या रागनीतीचे संगीत सेरेमनीमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये परिनीती सिल्वर कलरच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. तर राघवने ब्लॅक कलरची ड्रेसिंग केली आहे. दोघेही यावेळी खूपच आनंदी आणि डान्स करताना दिसत आहेत.

९० च्या दशकाच्या थीमवर आधारित या संगीत सेरेमनीमध्ये राघव- परिनीतीसह त्यांच्या कुटुंबांनीही मनापासून डान्स केला. दरम्यान, राघव आणि परिणीतीच्या संगीत सेरेमनीशी संबंधित आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. परिणीती आणि राघवच्या लग्नसोहळ्यासाठी पाहुणे उदयपूरमध्ये दाखल होतच आहेत. दोघांच्याही चाहत्यांना या लग्नाबाबत खूपच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT