Nikita Rawal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikita Rawal: चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून बॉलिवूड अभिनेत्रीला लुटलं, घरातील रोख रक्कम आणि दागिने केले लंपास

Nikita Rawal Looted By House Staff: निकिताच्या ओळखीच्या व्यक्तीनेच आपल्या साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केले आहे.

Priya More

Bollywood Actress Nikita Rawal:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री निकिता रावलसोबत (Nikita Rawal) धक्कादायक घटना घडली आहे. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून निकिता रावलला लुटल्याची घटना समोर आली आहे. निकिताच्या राहत्या घरामध्ये ही चोरीची घटना घडली आहे. ओळखीच्या व्यक्तीनेच आपल्या साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केले आहे. निकिताच्या घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन आरोपी फरार झाले.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री निकिता रावल घरामध्ये असताना तिच्याच घरामध्ये काम करणाऱ्या नोकराने चोरी केली. या नोकराने अभिनेत्रीला बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून साडेतीन लाख रुपये लंपास केले. आरोपीच्या सोबत काही जण होती. या टोळीने अभिनेत्रीला बंदुकीचा धाक दाखवत मागण्या मान्य न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. निकिताने घाबरून आरोपींना घरातील सर्व रक्कम आणि दागिने दिले.

निकिताच्या घरामध्ये चोरी करणारा आरोपी हा तिच्या घरामध्ये काम करणाराच कर्मचारी आहे. आरोपीने त्याच्या काही साथीदारांच्या मदतीने हा प्लॅन आखला होता. आरोपींनी साडीतीन लाख रुपयांची रक्कम घेतली आणि घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेमुळे अभिनेत्रीला मोठा घक्का बसला. या घटनेनंतर निकिताने थेट मालाडच्या बांगूर पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरमी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

या घटनेनंतर निकिताने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये तिने असे म्हटले आहे की, 'मला मोठा धक्का बसला आहे. माझ्या घरातीलच एका कर्मचाऱ्याने असं कृत्य केलं यावर माझा विश्वास बसत नाही. लोक आधी विश्वास संपादन करतात आणि नंतर त्याचा असा गैरवापर करतात हे खूपच त्रासदायक आणि वाईट आहे. एखाद्या गुंडांच्या टोळीने तुम्हाला बंदुकीचा धाक दाखवून आणि तुमच्या गळ्यावर चाकू ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली. असे असताना तुम्ही खरोखर काहीच करू शकत नाही. मागण्या मान्य न केल्यास तुझा गळा कापला जाईल अशी धमकी ते सतत देत होते.’

'या घटनेचा मला खूप मोठा धक्का बसला आहे. आरोपींनी साडेतीन लाख रुपये आणि माझे सर्व दागिने लंपास केले जे मी खूप मेहनतीने जमा केले होते. एक भयानक अनुभव होता आणि मी तो शब्दात सांगू शकत नाही. मी याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.' दरम्यान, निकिता रावलने फक्त बॉलिवूड चित्रपटात नाही तर साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अभिनेता अनिल कपूर यांच्यासोबत ती 'ब्लॅक अँड व्हाईट' चित्रपटात दिसली होती. त्याचसोबत जॉन अब्राहमसोबत 'गरम मसाला' या चित्रपटात तिने काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT