Kareena Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor साऊथ फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू करणार, यशच्या 'टॉक्सिक'मध्ये दिसणार?

Kareen Kappor Film: क्रू चित्रपटामध्ये करीना कपूरसोबत क्रिती सेनॉन आणि तब्बू देखील दिसणार आहे. या तिन्ही अभिनेत्री या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहेत. राजेश कृष्णन दिग्दर्शित हा चित्रपट 29 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Priya More

Kareena Kapoor Debut In South Film:

बॉलिवूडची (Bollywood) 'बेबो' अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'क्रू'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा ट्रेलर पाहून प्रेक्षक करीनाचा चित्रपट रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये करीना कपूरसोबत क्रिती सेनॉन आणि तब्बू देखील दिसणार आहे. या तिन्ही अभिनेत्री या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहेत. राजेश कृष्णन दिग्दर्शित हा चित्रपट 29 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. अशामध्ये आता करीना कपूरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. करीना लवकरच साऊथ फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री करणार आहे.

करीना कपूर लवकरच साऊथ फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री करणार आहे. ही गुड न्यूज स्वत: करीना कपूरने सांगितली आहे. करिनाने सांगितले की, 'ती एका खूप मोठ्या साऊथ चित्रपटात काम करणार आहे आणि यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, ती KGF स्टार यशच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटामध्ये तर दिसणार नाही ना? अलीकडेच Reddit अकाउंट Bollyblinds Gossip ने करिनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये करीनाने हा खुलासा केला आहे.

या व्हिडिओमध्ये ती साऊथ इंडस्ट्रीतील डेब्यूबद्दल बोलत आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला वाटते की यशसोबत करिनाचा चित्रपट पक्का झाला आहे! करीनाने काल चाहत्यांसोबत झालेल्या झूम मिटिंगमध्ये ही माहिती दिली. व्हिडिओ क्लिपमध्ये करीना म्हणाली, 'आता मी म्हटल्याप्रमाणे साऊथचा खूप मोठा चित्रपट करू शकते. आता हे संपूर्ण भारतासारखे असेल. त्यामुळे मी कुठे शूटिंग करणार आहे हे मला माहीत नाही. परंतु मी हे पहिल्यांदाच होणार असून मी खूपच उत्सुक आहे.'

त्याचवेळी करीनाचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'ती 'टॉक्सिक' आणि 'सिंघम' सारखे मोठे चित्रपट करत आहे आणि 'जाने जान', 'क्रू', 'द बकिंगहॅम मर्डर्स' यासारखे चित्रपटही ती करत आहे.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'ती तिचा पहिला पॅन इंडिया चित्रपट यशसोबत करणार आहे. वयाच्या 42 व्या वर्षी! मला वाटतं की फिल्म इंडस्ट्री किती कामुक असू शकते.' अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT