Kangana Ranaut  SaamTv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Video : अयोध्येमध्ये पोहचतात रामभक्तीत तल्लीन झाली कंगना रनौत, हनुमान गढी मंदिरात झाडू मारत केली स्वच्छता

Kangana Ranaut Cleaned Hanuman Garhi Temple: अभिनेत्री कंगना रनौत अयोध्येमध्ये दाखल झाली. कंगना रनौतने हनुमान गढी मंदिराला भेट देत दर्शन घेतले. या ठिकाणी तिने झाडू देखील मारला. कंगनाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya More

Kangana Ranaut Video:

राम मंदिराचा (Ram Madir) प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या म्हणजे २२ जानेवारीला होणार आहे. सध्या या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून ती अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आता अयोध्या धाम रामलल्लाच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. या ऐतिहासिक क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण अवघ्या काही तासांनी राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षिदार होण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अयोध्येमध्ये रवाना झाले आहेत. नुकताच अभिनेत्री कंगना रनौत अयोध्येमध्ये दाखल झाली. कंगना रनौतने हनुमान गढी मंदिराला भेट देत दर्शन घेतले. या ठिकाणी तिने झाडू देखील मारला. कंगनाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी कंगना रनौत रामभक्तीमध्ये तल्लीन झाली आहे. तिने हनुमान गढी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि मंदिरामध्ये झाडू मारत स्वच्छता केली. याठिकाणी तिने हवन देखील केले. कंगनाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'आओ राम आओ!', असे लिहिले आहे. कंगनाने यावेळी साडी नेसली होती, तिने हेवी ज्वेलरी कॅरी घालत कपाळावर मोठी टिकली लावली होती. याचसोबत तिने सनग्लासेस देखील लावला होता.

कंगना रनौतने मंदिरामध्ये झाडू मारल्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक होत आहे. यावेळी मीडियाशी बोलताना अभिनेत्रीने सांगितले की, 'मला हनुमानजीच्या मंदिरात येऊन साफसफाई करावीशी वाटली. ज्यापद्धतीने मी विचार केला होता त्यापद्धतीने साफसफाई झाली नाही पण मी खूप आनंदी आहे.' त्याचवेळी अयोध्येबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली की, 'सर्वत्र फुलांची सजावट केली जात आहे, लोक भक्तीगीतांमध्ये तल्लीन झाले आहेत, अयोध्या खरोखरच स्वर्ग झाल्यासारखे वाटते.'

अभिनेत्री कंगना राणौत म्हणाली की, 'अयोध्येला एखाद्या वधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. ठिकठिकाणी भजन आणि यज्ञांचे आयोजन करण्यात येत आहे. जणू काही आपण 'देवलोक' पर्यंत पोहोचलो आहोत. आता अयोध्येत आल्याने खूप छान वाटत आहे.' दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बॉलिवूडपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीपर्यंत अनेक सेलिब्रिटींना आमंत्रण पाठवण्यात आले आहेत. या सेलिब्रिटींनीध्ये कंगना रनौत, हेमा मालिनी, अनुष्का शर्मा, आयुष्मान खुराना, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, सनी देओल, रजनीकांत, रणबीर कपूर यासारख्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमित ठाकरेंना पोलिसांची नोटीस; शिवाजी पुतळा अनावरणाचा वाद चिघळला|VIDEO

Batata Rassa Recipe: गावरान पद्धतीचा झणझणीत बटाट्याचा रस्सा कसा बनवायचा?

Maharashtra Politics: निवडणुकांच्या आधी राज्यात नवी घडामोड! ठाकरेंप्रमाणे राजकारणात आणखी दोन बंधू येणार एकत्र

Maharashtra Live News Update: तुळजापुर नगरपरिषदेत भाजपने खाते उघडले, डॉ.अनुजा अजित कदम परमेश्वर यांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड

कुख्याला लॉरेन्स बिश्र्नोईच्या भावाला मुसक्या बांधून भारतात आणलं; अनमोल बाबा सिद्दिकी हत्याकांडातील आरोपी

SCROLL FOR NEXT