Kangana Ranaut Emergency Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Emergency: कंगना रनौतने हटवला 'इमर्जन्सी'च्या रिलीज डेटवरील पडदा, 'या' दिवशी येतोय भेटीला

Kangana Ranaut Emergency Movie: कंगनाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवटवर या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत चित्रपटाची रिलीज डेट जाहिर केली आहे. पुढच्या १४ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Priya More

Emergency Movie Release Date:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे (Emergency Movie) चांगलीच चर्चते आहेत. तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट कधी रिलीज होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता कंगना रनौतनेच या चित्रपटाच्या रिलीज डेटवरील पडदा हटवत तारीख जाहीर केली आहे. कंगनाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवटवर या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत चित्रपटाची रिलीज डेट जाहिर केली आहे. पुढच्या १४ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

नुकताच कंगना रनौतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवटर या चित्रपटासंबंधित महत्वाची पोस्ट केली आहे. 'इमर्जन्सी' या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'भारताच्या सर्वात गडद काळामागील कथा उघड करत आहे. 14 जून 2024 रोजी 'इमर्जन्सी'ची घोषणा. चित्रपटगृहांमध्ये सर्वात भयंकर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गर्जनेने इतिहास जिवंत होतो. 'इमर्जन्सी' 14 जून 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये.' कंगना रनौतच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. तिच्या या पोस्टला आतापर्यंत 50 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.'

कंगना रनौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट येत्या 14 जून 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये कंगना रनौत ही इंदिरा गांधींच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. या चित्रपटाची रिलीज डेट याआधी पुढे ढकलण्यात आली होती. हा चित्रपट आधी नोव्हेंबर 2023 मध्ये रिलीज होणार होता. पण आता 'इमर्जन्सी' चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे. याच दिवशी कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर 'इमरर्जन्सी'ची टक्कर 'चंदू चॅम्पियन'सोबत होणार आहे.

'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये कंगना रनौतने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तिने या चित्रपटात फक्त मुख्य भूमिका साकारली नाही तर तिने या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. यात विरोधी पक्षनेते जेपी नारायणच्या भूमिकेत अनुपम खेर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत श्रेयस तळपदे आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत मिलिंद सोमण दिसणार आहेत. 'इमर्जन्सी'मध्ये महिमा चौधरी आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT