Kangana Ranaut Instagram
मनोरंजन बातम्या

'तेजस' रिलीज होताच कंगना रनौतने केली 'Tanu Weds Manu 3'ची घोषणा, यावेळी तनुचा मनु कोण असणार?

Kangana Ranaut New Movie: यावेळी कंगनाने तिच्या ३ नवीन प्रोजेक्ट्सचा खुलासाही केला आहे.

Priya More

Tanu Weds Manu 3:

बॉलिवूडची (Bollywood) 'कॉन्ट्रव्हर्सि क्वीन' अर्थात अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Rauant) 'तेजस' चित्रपट (Tejas Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट कंगनाचा 2023 मधील मोस्ट अवेटेड चित्रपट होता. अखेर हा चित्रपट 27 ऑक्टोबर म्हणजे आज प्रदर्शित झाला.

'तेजस'मध्ये कंगना रनौतने एअरफोर्स ऑफिसर तेजस गिलची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे सर्वस्तरावरून खूप कौतुक होत आहे. याचदरम्यान कंगनाने तिच्या ३ नवीन प्रोजेक्ट्सचा खुलासाही केला आहे. महत्वाचे म्हणजे कंगनाने 'तनु वेड्स मनु 3'ची (Tanu Weds Manu 3)घोषणाही केली आहे. ( साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कंगनाने IMDb शी संवाद साधतान कंगनाने तिच्या नवीन प्रोजेक्टबद्दल सांगितले. कंगना म्हणाली की, 'माझा पुढचा प्रोजेक्ट एक थ्रिलर चित्रपट आहे. ज्यामध्ये मी विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. कंगनाने पुढे सांगितले की, मी बंगाली थिएटरच्या दंतकथेवर आधारित 'नोटी बिनोदिनी' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा आधीच झाली होती.

यासोबतच कंगनाने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी देखील शेअर केली. ती म्हणाली की, माझा तिसरा प्रोजेक्ट 'तनु वेड्स मनु 3' आहे.' कंगनाच्या 'तनु वेड्स मनु'चे दोन्ही भाग ब्लॉकबस्टर होते. अशामध्ये तिचे चाहते तिसर्‍या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. आता कंगनाने स्वतः 'तनु वेड्स मनु 3' ची माहिती दिली आहे. त्यामुळे कंगनाचे चाहते आनंदीत झाले आहे.

दिग्दर्शक आनंद एल राय यांनी हा चित्रपट तयार होत नसल्याचे सांगितले होते. आनंद कंगनाच्या फ्रेंचायझीच्या तिसऱ्या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसंच, आर माधवन या फ्रँचायझीमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे की नाही हे देखील स्पष्ट झाले नाही. पण कंगनाला विचारण्यात आले की, तिला कोणत्या दिग्दर्शकासोबत पुन्हा काम करायला आवडेल. तेव्हा अभिनेत्रीने आनंदचे नाव घेतले आणि म्हणाली, 'मी सरांना सांगत होते की माझ्यासाठी हा चित्रपट कधीच नव्हता. ही फक्त एक सहल होती ज्याचा मी एक भाग होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनला निरोपाला कधी? परतीच्या पावसाची तारीख आली समोर

Maharashtra Dasara Melava Live Update : संघाला १०० वर्षे, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?

Mhada Homes: मुंबईत म्हाडाची घरे महागली! ठाणे, पनवेल, पालघर परिसरात ३५० हेक्टर जमीन उपलब्ध करण्याची मागणी

New Expressway : नागपूरमधून आणखी एक एक्सप्रेस वे जाणार, फडणवीस सरकारने दिली मान्यता

Arvind Srinivas: फक्त ३१व्या वर्षी तब्बल २१,१९० कोटींचा मालक, कोण आहेत अरविंद श्रिनिवास?

SCROLL FOR NEXT