Deepika Padukone Fighter Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Fighter Movie: स्क्वाड्रन लीडर मीनल राठोडच्या भूमिकेत दीपिका पादुकोण येतेय भेटीला, अभिनेत्रीचा 'फायटर' लूक पाहिलात का?

Priya More

Deepika Padukone Fighter Movie:

'पठाण' (Pathan Movie) आणि 'जवान'च्या (Jawan Movie) यशनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या आगामी चित्रपट फायटरमुळे चर्चेत आहे. दीपिका पदुकोणच्या या चित्रपटाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट दीपिका पादुकोणचा या वर्षातला शेवटचा चित्रपट आहे. हृतिक रोशननंतर आता 'फायटर' (Fighter Movie) चित्रपटातील दीपिका पदुकोणचा लूक समोर आला आहे. दीपिकाचा हा डॅशिंग लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दीपिका पदुकोण या चित्रपटात स्क्वाड्रन लीडर मीनल राठौरच्या भूमिकेत आहे. दीपिकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये या चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या चित्रपटातील माझी कॉल साइन 'मिन्नी' आहे.' 'फायटर' चित्रपटातील दीपिकाचा लूक खूपच अप्रतिम आहे. यामध्ये अभिनेत्री एअर ड्रॅगन युनिटमध्ये स्क्वाड्रन पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दीपिका पदुकोणचा फायटर लूक खूपच धमाकेदार आणि प्रभावी आहे. यामध्ये अभिनेत्रीने काळा गॉगल घातला आहे आणि स्क्वाड्रन लीडरच्या युनिफॉर्ममध्ये ती खूपच छान दिसत आहे. दीपिकाने फर्स्ट लूकचा फोटो शेअर करताच सर्वजण तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. याआधी हृतिक रोशनचा लूक समोर आला होता जो खूपच अप्रतिम होता. या चित्रपटात हृतिक अभिनेता स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानियाच्या भूमिकेत आहे. या सिनेमात हृतिकचा कॉल साइन पॅटी आहे.

या चित्रपटाच्या शूटिंग लोकेशन्सवरूनही अनेक फोटो समोर आले आहेत. या फोटोंमधील हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळाली होती. करण जोहरच्या चॅट शोमध्ये दीपिकानेही हृतिक आणि तिच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची देखील प्रशंसा केली होती. आता या चित्रपटातील दीपिका आणि हृतिकची केमस्ट्री पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

दरम्यान, हृतिक आणि दीपिकाचा 'फायटर' हा इतर चित्रपटापेक्षा वेगळा आहे. या चित्रपटाची कथा वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला असून वायकॉम 18 स्टुडिओने मार्फ्लिक्स पिक्चर्सच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांनी भरपूर अॅक्शन आणि देशभक्तीची भावना पाहायला मिळणार आहे. 'फायटर' चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga: योगा केल्यावर लगेच पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Viral Video: ट्रॅफिकमध्ये कार अडकली, खासदार सुप्रिया सुळेंनी केली बाईकवारी; VIDEO होतोय व्हायरल

Yuvraj Singh News : युवराज बनला विराटचा शेजारी, मुंबईत खरेदी केलं अलिशान घरं; किंमत वाचून व्हाल थक्क

Bigg Boss Marathi : निक्कीच्या प्रेमात अरबाजची तहान भूक हरपली, मनधरणी करत म्हणाला…

Relationship Tips : रोजच्या भांडणांमुळे नातं तुटण्याची भीती वाटतेय? आजपासून 'या' टिप्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT