Bipasha Basu Daughter Saam TV
मनोरंजन बातम्या

Bipasha Basu Daughter: 'दिल है छोटासा ...' बिपाशा बसूने शेअर केला देवीचा क्युट VIDEO

Bipasha Basu Daughter Devi Video: नुकताच बिपाशाने आपल्या मुलीचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

Priya More

Devi Cute Video:

बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) सिनेसृष्टीपासून दूर असली तरी देखील ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आई झाल्यापासून बिपाशा बसू सोशल मीडियावर आपल्या मुलीचे क्युट फोटो आणि आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बिपाशाने गोंडस मुलीला जन्म दिला.

आपल्या मुलीसोबत सध्या ती जास्तीत जास्त टाईम स्पेंड करत आहे. नुकताच बिपाशाने आपल्या मुलीचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

बिपाशा बसू ही एक प्रेमळ आई आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या मुलीची झलक शेअर करताना दिसते. पण बिपाशाने कधीच आपल्या मुलीचा चेहरा दाखवला नाही. ती नेहमी तिचे पाठमोरे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच बिपाशा बसूने तिची मुलगी देवीचा एक गोंडस व्हिडिओ शेअर केला आहे. जो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या व्हिडीओमध्ये बिपाशा मुलीसोबत मजामस्ती करताना दिसत आहे.

काही तासांपूर्वी बिपाशा बसूने देवीचा एक क्यूट व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये बिपाशा आपली मुलगी देवीसोबत खेळताना दिसत आहे. त्यानंतर देवी जमिनीवर खेळताना दिसत आहे. पिवळ्या रंगाच्या एथनिक सूट आणि मोठे कानातले घातलेली बिपाशा खूप सुंदर दिसत आहे. कपाळावर लावलेली गुलाबी रंगाची टिकली बिपाशावर खूपच उठून दिसत आहे. तर चिमुकल्या देवीने गुलाबी रंगाचा फुलांची प्रिंट असलेला सूट परिधान केला आहे. यामध्ये देवी खूपच गोंडस दिसत होती.

या व्हिडीओला बिपाशाने 'दिल है छोटासा' हे गाणं लावले आहे. देवीचा हा क्यूट व्हिडीओ शेअर करत बिपाशाने त्याला कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. पण व्हिडिओ शेअर करत तिने गुलाबी रंगाचे फूल आणि नजर ताबीज इमोजी टाकला आहे. बिपाशाने शेअर केलेल्या व्हिडीओला तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. ही पोस्ट शेअर केल्याच्या काही मिनिटांनंतर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत दोघींचं देखील कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

SCROLL FOR NEXT