Alia Bhatt With Mother And Father Saam TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Interview: 'माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते, दारूच्या व्यसनात...', वडील महेश भट्टबद्दल पहिल्यांदाच बोलली आलिया भट्ट

Mahesh Bhatt And Soni Razdan: आलियाने नुकताच एका मुलाखतीत तिचे वडील महेश भट्ट यांना दारूचे लागलेले व्यसन आणि आई सोनी राजदान यांच्या संघर्षाबद्दल खुलेपणाने सांगितले आहे.

Priya More

Alia Bhatt News:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलियाने नुकताच तिच्या आगामी 'जिगरा' चित्रपटाची (Jigra Movie) घोषणा केली. आलिया भट्ट सध्या चर्चेत आली आहे. त्यामागचे कारण म्हणजे तिने नुकताच एका मुलाखतीत तिचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांना दारूचे लागलेले व्यसन आणि आई सोनी राजदान (Soni Razdan) यांच्या संघर्षाबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. या मुलाखतीमध्ये आलियाने वडील महेश भट्ट आणि आई सोनी राजदान यांच्याबद्दल अनेक गुपिते उघड केली आहेत.

आलिया भट्टने मुलाखतीमध्ये सांगितले की, 'एकेकाळी माझ्या वडिलांचे एक नाही तर अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. त्याच्याकडे पैसे नव्हते आणि त्यांना दारूचे व्यसन लागले होते. त्यांनी दारू सोडण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण त्यांनी आयुष्यात आणि कामात अनेक चढउतार पाहिले होते. मी त्यांच्या विशेषाधिकाराचा आनंद घेऊ शकेल यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. उद्या जरी मी चांगली कामगिरी केली नाही आणि मला चित्रपटाच काम मिळणे बंद झाले. तरी मला अशा चांगल्या संधी मिळाल्या हे मी नेहमीच स्वीकारते. त्यामुळे मी कधीही तक्रार करू शकत नाही.' ग्लॅमरच्या दुनियेतील तिचा प्रवास तिच्या आई-वडिलांपेक्षा किती सोपा होता हेही यावेळी आलियाने उघडपणे सांगितले.

आई सोनी राजदानबद्दल बोलताना आलिया भट्टने सांगितले की, 'माझी आई जेव्हा चित्रपटात आली तेव्हा तिचे कोणाशीही कनेक्शन नव्हते. माझी आई दुसरीकडून आली होती आणि तिला स्वतःचे नाव कसे कमवायचे हे माहिती नव्हते. इतके कष्ट करूनही माझी आई कधीही मुख्य प्रवाहातील अभिनेत्री होऊ शकली नाही. पण तिने खूप मेहनत घेतली. तिचा चित्रपटांशी संबंध नव्हता आणि ती ऑडिशन्ससाठी थिएटरमध्ये जायची. फिल्म स्टुडिओ आणि टेलिव्हिजन स्टुडिओमध्ये ती जायची. तिला हिंदीही नीट बोलता येत नव्हते. त्यामुळे तिच्यासाठी हे करिअर खूप अवघड होते.'

'लोक म्हणतात की, तुम्हाला फक्त कठोर परिश्रम करण्याची गरज आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल. पण हे खरे नाही.', असं मत आलियाने यावेळी मांडलं. आलिया भट्ट म्हणाली की, 'तिच्या आईसाठी कोणतेही काम छोटे नव्हते आणि जेव्हाही तिला संधी मिळते तेव्हा तिने अभिनय केला. मग तो टीव्ही असो किंवा चित्रपट. त्याचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला. मी किती नशीबवान आहे याची जाणीव तिने मला लवकर करून दिली.'

दरम्यान, महेश भट्ट यांनी ८० च्या दशकात 'अर्थ' आणि 'सारांश' सारखे चित्रपट तयार केले होते. उत्कृष्ट सिनेमा तयार करण्यासाठी त्यांची ओळख आहे. तर सोनी राजदानने 'बुनियाद' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात देखील काम केले आहे. दरम्यान, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता लवकरच आलिया 'जिगरा' या चित्रपटात काम करणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT