Sunny Deol  Saam TV
मनोरंजन बातम्या

Sunny Deol: खरंच सनी देओल दारूच्या नशेत रस्त्यावर फिरत होता का?, व्हायरल व्हिडीओनंतर स्वत:च दिलं उत्तर

Sunny Deol Safar Movie: नुकताच सोशल मीडियावर सनी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दारूच्या नशेत रस्त्यावर फिरत असल्याचा सनीचा व्हिडीओ (Sunny Deol Video) पाहून नेटिझन्स त्याला ट्रोल करत आहे.

Priya More

Sunny Deol Viral Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सनी देओल (Sunny Deol) दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. 'गदर 2' मुळे (Gadar 2 Movie) त्यांच्या लोकप्रियतेत भर पडली. या चित्रपटाच्या माध्यमातून सनी देओलने मोठ्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री केली. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाच्या यशानंतर सनी देओलकडे एकापाठोपाठ एक चित्रपट येत आहेत.

येत्या काळामध्ये तो अनेक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशामध्ये नुकताच सोशल मीडियावर सनी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दारूच्या नशेत रस्त्यावर फिरत असल्याचा सनीचा व्हिडीओ (Sunny Deol Video) पाहून नेटिझन्स त्याला ट्रोल करत आहे. पण आता अभिनेत्याने या ट्रोलिंगनंतर ट्रोलर्सला उत्तर देत चर्चांना पूर्णविराम दिले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सनी देओल दारूच्या नशेमध्ये रात्रीच्या वेळी मुंबईतल्या रस्त्याच्या मधोमध चालत आहे. त्याला नीट चालता देखील येत नाहीये. अशामध्ये तो एका ऑटो रिक्षाला जाऊन धडकतो. त्यावेळी सनी देओल या रिक्षावाल्यासोबत काही तरी बोलताना आणि हसताना दिसतो. व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला रिक्षावाला हटकतो. दारू प्यायलेल्या सनीला रिक्षावाला कसा तरी पकडतो आणि मदत करतो. त्यानंतर सनीला तो रिक्षामध्ये बसवतो.' सनीचा हा व्हिडीओ जुहू सर्कल परिसरातील आहे.

सनी देओलचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स त्याला ट्रोल करत आहेत. पण खरंच सनी देओल दारूच्या नशेमध्ये रस्त्यावर फिरत होता का?, हा व्हिडीओ खरा आहे का? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले होते. अखेर सनी देओलने या व्हिडीओवर मौन सोडले आहे. त्याने या व्हिडीओमागचे सत्य सांगितले आहे.

नुकताच सनी देओलने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो दारूच्या नशेत रस्त्यावरून चालताना दिसत आहे आणि कॅमेरा टीम त्याच्या समोरून चालत शूट करत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सनी देओलने लिहिले की, "अफवाहों का सफर बस यही तक" म्हणजेच अफवांचा प्रवास इथपर्यंतच.

सनी देओलने व्हिडीओ शेअर करत त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये 'सफर'ला कोट-अनकोट केले आहे. याचाच अर्थ ते त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. सनी देओलने शेअर केलेला व्हिडीओ त्याच्या 'सफर' चित्रपटातील शूटिंगदरम्यानचा आहे. सनी देओलने या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिल्यामुळे आता त्याच्या चाहत्यांच्या मनामध्ये व्हिडीओवरून निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, संजय राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले; म्हणाले, अजित पवार...

SCROLL FOR NEXT