Shahid Kapoor Buy New Car Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahid Kapoor आणि Meera Rajput ने खरेदी केली कोट्यवधींची Mercedes-Maybach GLS 600, कारची किंमत ऐकून व्हाल थक्क

Shahid Kapoor Buy Mercedes Car: शाहिद कपूरकडे आधीच अनेक आलिशान कारचे कलेक्शन आहेत. आता त्याच्या गॅरेजमध्ये आणि कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज मेबॅकचा समावेश झाला आहे. या कारची किंमत ऐकून सर्वजण आश्चर्यचकीत होत आहेत.

Priya More

Shahid Kapoor Buy New Car:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या चर्चेत आला आहे. शाहिद चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे नुकताच त्याने कोट्यवधीची आलिशान मर्सिडीज कार खरेदी केली आहे. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत (Meera Rajput) यांचा नवीन लक्झरी कारसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहिद कपूरकडे आधीच अनेक आलिशान कारचे कलेक्शन आहेत. आता त्याच्या गॅरेजमध्ये आणि कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज मेबॅकचा समावेश झाला आहे. या कारची किंमत ऐकून सर्वजण आश्चर्यचकीत होत आहेत.

शाहिद कपूरला आलिशान कारची प्रचंड आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या आणि लक्झरी कार आहेत. अशामध्ये शाहीद आणि मीराने यावर्षाच्या अखेरीस आणखी एक नवीन आलिशान कार खरेदी केली. मंगळवारी शाहिद आणि मीराने कोट्यवधी रुपयांची मर्सिडीज मेबॅक कार खरेदी केली. या कारची किंमत २.९६ कोटी रुपये इतकी आहे. शाहिदने २०२२ मध्येच मर्सिडीज मेबॅक एस - ५८० कार खरेदी केली होती. या कारची किंमत २.८ कोटी रुपये इतकी होती.

शाहिदने मर्सिडीज मेबॅक कार खरेदी केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लक्झरी कारच्या अधिकृत पेज मेबॅच इंडियाने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शाहिद आणि मीराचा कारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कारसोबत पोज देताना दिसत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या चाहत्यांसह सेलिब्रिटींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहिद कपूरने खरेदी केलेल्या या नव्या Mercedes-Maybach GLS 600 कारची किंमत २.९६ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. शाहिदच्या कार कलेक्शनमध्ये Maybach S580, Range Rover Vogue, Porsche Cayenne GTS, Jaguar XKR-S आणि Mercedes-AMG S400 सारख्या आलिशान कार आहेत. त्याच्या या प्रत्येक कारची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरामध्ये आहे.

दरम्यान, शाहिद कपूरने नुकताच खरेदी केलेली Maybach GLS 600 ही कार बॉलिवूडच्या इतर सेलिब्रिटींकडे देखील आहे. रणवीर सिंग, क्रिती सेनन, अर्जुन कपूर आणि नीतू कपूर यांच्याकडे देखील ही कार आहे. शाहिद कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, शाहिद कपूर यावर्षी 'फर्जी' आणि 'ब्लडी डॅडी' या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता लवकरच तो लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT