Shah Rukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Video: महिलेने धुडकावली शाहरूख खानची लोन ऑफर, ३ मिनिटांच्या VIDEO मध्ये नेमकं काय घडलं?

Shah Rukh Khan Jawan Movie: बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानची सध्या त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटामुळे सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Priya More

Jawan Movie:

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटामुळे (Jawan Movie) सगळीकडे चर्चा सुरु आहे. सध्या सगळीकडे जवानचाच बोलबाला सुरु आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये शाहरूख खान सध्या बिझी आहे. नुकताच त्याने 'रेडिओ प्लस'ला मुलाखत दिली.

यावेळी त्याने आपल्या एका चाहतीसोबत Prank केला. रवी केळकर म्हणून त्याने आपल्या चाहतीला फोन केला आणि बँकेकडून तिला लोन देत असल्याची ऑफर दिली. पण त्याच्या चाहतीने ही ऑफर धुडकावून लावली. सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानचा हा Prank व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तुम्हीसुद्धा हा मजेशीर व्हिडिओ पाहून हसल्याशिवाय राहणार नाहीत.

पावणे चार मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाहरुख खान एका महिलेला फोन लावतो. मी रवी केळकर असल्याचे सांगून तो या महिलेला मी बँकर असल्याचे सांगतो. पुढे तो म्हणतो, कारण असं आहे की डिमोनेटाइजेशन, जीएसटी या सर्व कारणांमुळे आम्ही लोन ऑफर करत आहोत. पण ही महिला सांगते की मला यामध्ये इंटरेस्ट नाही. तर शाहरुख पुढे तिला सांगतो की, आमचे इंटरेस्ट रेट खूपच कमी आहे. आमचे लोन अनलिमिटेड आहे. असं नाही की १०० रुपये किंवा १००० रुपयांचे तुम्हाला पाहिजे तेवढ्याचे मिळेल.

समोरील महिला त्याला पुन्हा सांगते की, मला यामध्ये खरंच इंटरेस्ट नाही. शाहरूख पुन्हा तिला सांगतो की, आम्ही इंटरेस्ट रेट पुढच्या सहा महिन्यांपर्यंत घेणारच नाही. ही एक बँक फॅसिलीटी आहे. तुम्ही ही ऑफर घ्या. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ही खूप चांगली ऑफर आहे. तर महिला म्हणजे मला त्रास देऊ नका. मला लोन वैगरे काही नको. तर शाहरुख पुन्हा तिला सांगतो की, हे लोन नाही ही एक फॅसिलिटी आहे. लोन तेव्हा असते जेव्हा तुमच्याकडून इंटरेस्ट रेट घेतला जातो. तुम्ही हे पैसे ठेवा. सहा महिने वापरा. त्यापुढे कितीही शून्य लावा आणि त्या पैशांचा वापर करा.

ही महिला शाहरुखला पुन्हा सांगते की, मला इंटरेस्ट नाही. तर शाहरुख तिला म्हणतो, पहिल्यांदाच मला एखादी व्यक्ती पैसे घेण्यापासून नाही म्हणत आहे. महिला सांगते, मी इतक्या समजूतदारपणे बोलते त्यामुळे तुम्ही बोलतच चालला आहात. त्यानंतर शाहरुख तिला तिच्या घरातील व्यक्तींबद्दल, तिच्या कामाबद्दल विचारपूस करतो. पण ही महिला सांगते, मला काहीच सांगचे नाही. त्यानंतर तो म्हणतो, मी बँक सुरु करणार आहे. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपण पार्टनरशिपमध्ये बँक सुरु करू.

त्यानंतर तो समोरच्या महिलेला सांगतो, मी जोक करत असून मी शाहरुख खान बोलत आहे. आता तरी पार्टनरशिप करशील का?. समोरची महिला त्याला विचरते की, खरंच तू शाहरुख बोलत आहे का? तू का माझी मस्करी करत आहे. शाहरुख खानसोबत बोलत असल्यामुळे ही महिला खूपच आश्चर्यचकीत होते. त्यानंतर ती म्हणते, मला तुझी ऑफर मान्य आहे. मला अजूनही विश्वासच बसत नाही आणि मी तुझी खूप मोठी फॅन आहे. त्यानंतर शाहरुख तिला तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. दरम्यान, शाहरुखचा हा Prank व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओला लाखोंच्या घरामध्ये लाईक्स मिळाले आहेत. तर ३.२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराचं निधन; मुलगा ऑस्कर विजेता, सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली | Bahubali

Maharashtra Live News Update : भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज आणि उद्या सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Beed News: बीडमध्ये रस्ता पाहणीदरम्यान ट्रक खड्ड्यात कोसळला|VIDEO

Shahapur News : टॉयलेटमध्ये रक्त आढळलं, विद्यार्थिनींची विवस्त्र करून तपासणी केली; शहापूरच्या इंग्लिश मीडियम शाळेतील प्रकार

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT