Jawan Collection
Jawan Collection Saam tv
मनोरंजन बातम्या

Jawan Movie Collection: किंग खानच्या 'जवान'ने UAE मध्ये रचला इतिहास, 'या' लिस्टमध्ये सहभागी होणारा ठरला पहिला भारतीय चित्रपट

Priya More

Shah Rukh Khan Movie:

बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' चित्रपट (Jawan Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) ब्लॉकबस्टर ठरला आहे. सप्टेंबरमध्ये रिलीज झालेल्या 'जवान' चित्रपटाला 54 दिवस पूर्ण झाले असले तरी देखील या चित्रपटाची क्रेझ अद्यापही शाहरूखच्या चाहत्यांमध्ये कायम दिसत आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबतच आंतरराष्ट्रीय कलेक्शनमध्ये जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले आहे. आता या चित्रपटाने आणखी एक जबरदस्त इतिहास रचला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शाहरूख खानचा 'जवान' चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आणि चौथा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. पण या चित्रपटाचा वेग इथेच थांबला नाही. बॉक्स ऑफिसवर 54 दिवस पूर्ण केलेल्या या चित्रपटाला अजूनही काही प्रमाणात यश मिळत आहे. जवान चित्रपटाची जादू अद्यापही सगळीकडे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. 'जवान' 2 नोव्हेंबरला OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. त्याआधी या चित्रपटाने यूएईमध्ये वेगळे स्थान मिळवले आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार 'जवान' यूएईमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यासह, जवान हा चित्रपट UAE बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचा 9वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. तिथे या चित्रपटाने USD 9.17 दशलक्ष म्हणजेच 75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. सध्या जवान चित्रपटाची क्रेझ यूएईमध्ये दिसून येत आहे. अजून पुढचे काही दिवस हा चित्रपट आणखी कमाई करेल असा देखील अंदाज वर्तवला जात आहे.

या यादीमध्ये या चित्रपटांचा आहे समावेश -

1. अवतार 2

2. एवेंजर एंडगेम

3. स्पायडरमॅन: नो वे होम

4. फ्यूरियस 7

5. द फेट ऑफ द फ्युरियस

6. अल्लादीन

7. टॉप गन: मावेरिक

8. द लायन किंग

9. जवान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Gochar: 12 वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात गुरू, या 3 राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल

Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

Weight Gain Tips: वजन वाढवायचंय? 'या' गोष्टी करुन 30 दिवसात व्हा 'वजनदार' माणूस

Mumbai Rain: ठाण्यात पावसाचा रेल्वे सेवेला फटका, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या

SCROLL FOR NEXT