Shah Rukh Khan Called Virat Kohli His Son In Law Instagram
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan And Virat Kohli News: ‘तो माझ्या जावयासारखा...’ विराट कोहलीबद्दल ‘किंग खान’ असं का म्हणाला?

Shah Rukh Khan on Virat Kohli: #AskSRK च्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या प्रश्नांची भन्नाट उत्तरं दिली आहेत.

Chetan Bodke

Shah Rukh Khan Called Virat Kohli His Son In Law

‘जवान’नंतर किंग खानचा येत्या काही दिवसांत ‘डंकी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या शाहरुख ‘जवान’च्या यशाचे आनंद साजरा करण्यात मग्न आहे. पण अशातच सध्या सोशल मीडियावर ‘डंकी’ची ही चर्चा होत आहे. शाहरुख खान नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. सध्या सोशल मीडियावर किंग खान ट्वीटर एक्सच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसत आहे. #AskSRK च्या माध्यमातून अभिनेत्याने चाहत्यांच्या प्रश्नांची भन्नाट उत्तरं दिली आहेत.

यावेळी किंग खानला ट्वीटर एक्सवर #AskSRK मध्ये, विराटविषयी काही प्रश्न विचारले आहेत. किंग खानला त्याच्या चाहत्याने ट्वीट करत विराट कोहलीबद्दल बोलण्यास सांगितले. त्यावेळी किंग खान ट्वीटवर म्हणाला, “विराट कोहलीबद्दल खूप खूप प्रेम... विराट माझा खूप चांगला मित्र आहे. तो यशस्वी व्हावा यासाठी मी कायमच प्रार्थना करतो. भाऊ नेहमीच मला जावयाप्रमाणे आहे...” सध्या अभिनेत्याचं हे ट्वीट नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चेत आहे.

त्यासोबतच, किंग खानचा नुकताच ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाला मिळत असलेल्या यशावरही त्याच्या एका चाहत्याने त्याला एक प्रश्न विचारला. शाहरुखला एका नेटकऱ्याने प्रश्न विचारला की, “ ‘जवान’चं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?, अनेक बातम्यांमध्येही खोटा आकडा दाखवतात.” नेटकऱ्याच्या प्रश्नावर किंग खानने उत्तर दिले की, “ गप्प बस... फक्त येणारा आकडा मोजत राहा, कमाईचा आकडा मोजताना लक्ष भरकटवू नकोस.” अशी त्याने प्रतिक्रिया दिली.

२०२३ हे वर्ष खरंतर जितकं बॉलिवूडसाठी खास ठरत आहे, तितकंच खास शाहरुख साठीही ठरत आहे. येत्या दिवाळीत आणि ख्रिसमसमध्ये शाहरुखचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दिवाळीत ‘टायगर ३’ तर ख्रिसमसमध्ये ‘डंकी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सलमानच्या ‘टायगर ३’मध्ये किंग खान मुख्य भूमिकेत नाही तर, कॅमिओ म्हणून दिसणार आहे. ‘डंकी’बद्दल सांगायचे तर, शाहरुखसोबत चित्रपटामध्ये तापसी पन्नुदेखील दिसणार आहे. चित्रपट येत्या २२ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दिसणार आहे.

शाहरुखबद्दल थोडक्यात सांगायचे तर, शाहरुख अखेरचा रुपेरी पडद्यावर ‘झिरो’मध्ये दिसला होता. त्यानंतर तो २०२३ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जानेवारीमध्ये ‘पठान’ आणि सप्टेंबरमध्ये ‘जवान’मधून त्याने आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले. ‘झिरो’नंतर काही वर्षांचा ब्रेक घेत किंग खानने ‘पठान’च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर जोरदार कमबॅक केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT