Randeep Hooda And Lin Laishram Trolled Saam Tv
मनोरंजन बातम्या

Randeep Hooda Trolled: तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..., रणदीप हुड्डा आणि लिन लॅशरामचे 'ते' फोटो पाहून नेटकरी संतप्त

Randeep Hooda And Lin Laishram Trolled: लग्नानंतर हे कपल न्यू इअरच्या सेलिब्रेशनसाठी केरळला गेले आहेत. याठिकाणी त्यांनी रोमँटिक फोटोशूट केले. हे फोटो पाहून नेटिझन्स संतप्त झाले असून ते रणदीप आणि लिनला ट्रोल करत आहेत.

Priya More

Randeep Hooda And Lin Laishram Photos:

बॉलिवूडचे (Bollywood) न्यूली मॅरिड कपल रणदीप हुड्डा (Randeep hooda) आणि त्याची पत्नी लिन लॅशराम (lin laishram) लग्न झाल्यापासून चांगलेच चर्चेत आहेत. रणदीप आणि लिन यांनी २९ नोव्हेंबरला मणिपूरमध्ये लग्न केले. मणिपूरच्या इंफाळ शहरात मेईतेई रितीरिवाजांनुसार रणदीप आणि लिनने पारंपारिक पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर हे कपल न्यू इअरच्या सेलिब्रेशनसाठी केरळला गेले आहेत. याठिकाणी त्यांनी रोमँटिक फोटोशूट केले. हे फोटो पाहून नेटिझन्स संतप्त झाले असून ते रणदीप आणि लिनला ट्रोल करत आहेत.

रणदीप हुड्डा लग्नानंतर न्यू इअरच्या सेलिब्रेशनसाठी पत्नी लिन लॅशरामसोबत केरळमध्ये गेला आहे. निसर्गरम्य वातावरणात एकमेकांना वेळ देत या कपलने नवीन वर्षाचं स्वागत केलं. रणदीपने यावेळी पत्नीसोबत काढलेले काही फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. हे फोटो पाहून नेटिझन्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. केरळच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी हे फोटोशूट केले आहे. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रणदीपने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये रणदीप शर्टलेस दिसत आहे. तर त्याची पत्नी लिनने मोनॉकिनी परिधान केली आहे. समुद्रकिनाऱ्यावर हे कपल एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहे. अशा कपड्यांमध्ये केलेल्या फोटोशूटमुळे या कपलला ट्रोल केले जात आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट्स करत एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, 'लग्न तर खूप संस्कारांनी केलं आणि आता तुम्हाला काय झालंय?'. तर, दुसऱ्या नेटकऱ्याने 'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', अशी कमेंट केली आहे.

रणदीप आणि लिन ट्रोल होण्यामागचे कारण म्हणजे, या कपलने अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले होते. त्यांच्या लग्नातील साधेपणा सर्वांना प्रचंड आवडला होता. पण आता त्यांनी नववर्षाच्या स्वागतासाठी केलेली ड्रेसिंग स्टाइल नेटिझन्सला अजिबात आवडली नाही. त्यामुळे ते त्यांना ट्रोल करू लागले आहेत. जरी नेटिझन्सला रणदीप आणि लिनचे फोटो आवडले नसले तरी देखील त्याच्या चाहत्यांनी मात्र त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रणदीपच्या या पोस्टला साडेपाच लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

SCROLL FOR NEXT