Raha First Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raha Kapoor First Look: निळे डोळे अन् क्युट स्माइल, आलिया-रणबीरने पहिल्यांदाच दाखवला मुलगी राहाचा चेहरा

Raha Kapoor Photos: निळे डोळे- क्युट स्माइल देणारी राहा इतकी सुंदर आणि गोंडस दिसते की तिला पाहून सर्वजण तिच्या प्रेमात पडले आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Priya More

Raha Kapoor:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची मुलगी राहा कशी दिसते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राहाचा चेहरा पाहण्यासाठी दोघांचे देखील चाहते खूपच उत्सुक आहेत. अशामध्ये जवळपास १४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रणबीर आणि आलियाने आपल्या परीचा म्हणजेच राहाचा चेहरा दाखवला आहे. निळे डोळे- क्युट स्माइल देणारी राहा इतकी सुंदर आणि गोंडस दिसते की तिला पाहून सर्वजण तिच्या प्रेमात पडले आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर या कपलने संपूर्ण जगासमोर आपल्या मुलीची पहिली झलक दाखवली आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने आई-बाबा झाल्यापासून आपल्या मुलीला नेहमी मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मात्र सोमवारी ख्रिसमसच्या मुहूर्तावर या कपलने आपली मुलगी राहाची संपूर्ण जगाला ओळख करून दिली. रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच त्यांची मुलगी राहासोबत मीडियासमोर पोज देताना दिसले. राहाचा गोंडसपणा पाहून प्रत्येक जण तिचे कौतुक करत आहे. सध्या सगळीकडे राहाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सेम टू सेम आलियासारखीच दिसते अशाप्रकारच्या कमेंट्स अनेक जण करताना दिसत आहेत.

राहाच्या जन्मानंतर रणबीर आणि आलियाने मुंबईतील सर्व पापाराझींना बोलावून त्यांच्या मुलीचे फोटो काढण्यास मनाई केली होती. तेव्हापासून राहाचे फोटो कधीच सोशल मीडियात शेअर झाले नाहीत. ऐवढंच नाही तर या कपलने आपल्या मुलीचे आतापर्यंत जे काही फोटो शेअर केले होते त्यामध्ये तिचा चेहरा कधीच दाखवला नाही. राहाच्या पहिल्या वाढदिवसाच्या फोटोमध्ये देखील तिचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. त्यामुळे दोघांचेही चाहते राहाला पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून आज त्यांना राहाला पाहायला मिळाले आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टने २४ डिसेंबरच्या रात्री आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवारासोबत पार्टी सेलिब्रेट केली. याचे फोटो आलियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. पण त्यामध्ये राहा कुठेच दिसली नव्हती. त्यांनी आज पुन्हा ख्रिसमस पार्टी केली. यावेळी त्यांच्यासोबत राहा देखील होती. याचवेळी त्यांनी पापाराझींसमोर राहाला आणले.

सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये दिसत आहे की, रणबीर कपूरने राहाला कडेवर घेतलं आहे. राहा देखील कॅमेऱ्याकडे बघून क्युट स्माइल देताना दिसत आहे. पिंक आणि व्हाइट कलरची फ्रॉक, डोक्यावर दोन पोनी आणि पायामध्ये लाल रंगाचे शूज घातलेली राहा खूपच गोंडस दिसत आहे. राहाच्या निळ्या डोळ्यांच्या प्रेमात सर्वजण पडले आहेत. दरम्यान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने १४ एप्रिल रोजी लग्न केले होते. त्यानंतर ६ ऑक्टोबरला आलियाने मुलीला जन्म दिला. राहा आता १ वर्ष २ महिन्यांची झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT