बॉलिवूड (Bollywood) अभिनेता करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) आज आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. मॉडेलपासून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता होण्यापर्यंताचा करणचा प्रवास काही सोपा नव्हता. करण सिंग गोहरने सुरुवातीला मॉडेलिंग केली. त्यानंतर त्याने टीव्ही मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यास सुरूवात केली आणि यामध्ये त्याला यश देखील आलं.
छोट्या पडद्यावर डॉक्टर अरमान बनून त्याने सर्नांच्या मनात स्थान निर्माण केले. नुकताच प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशच्या फायटर चित्रपटामध्ये करण देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसला. करणच्या वाढदिवसानिमित्त (Karan Singh Grover Bday) आज आपण त्यांच्या फिल्मी करिअरविषयी जाणून घेणार आहोत...
करण सिंग ग्रोव्हरने आपल्या कारकिर्दीला मॉडेल म्हणून सुरुवात केली. २००४ मध्ये ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल मॅनहंट स्पर्धेत त्याने भाग घेतला आणि सर्वात लोकप्रिय मॉडेलचा किताबही जिंकला. यानंतर, त्याने एमटीव्हीवरील एकता कपूरच्या टीव्ही शो 'कितनी मस्त है जिंदगी'मध्ये काम केले. या शोमधून त्याने टीव्हीमध्ये पदार्पण केले. मात्र, येथून त्याला हवी तशी ओळख मिळाली नाही.
करण सिंग ग्रोवरच्या करिअरला सुरुवात झाली जेव्हा त्याला स्टार वनच्या शो 'दिल मिल गए'मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि यामध्ये तो चाहत्यांसमोर डॉ. अरमानच्या भूमिकेत दिसला. या भूमिकेतून करण रातोरात स्टार झाला. यानंतर तो अनेक मालिकांमध्ये अभिनय करताना दिसला. करणने 'कसौटी जिंदगी की', 'सोलाह शृंगार', 'परिवार', 'कबूल है' या मालिकांमध्ये काम केले. 'कबूल है'मधील त्याच्या व्यक्तिरेखेलाही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली.
मालिकांव्यतिरिक्त करण सिंग ग्रोवर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. अभिनेत्याने २००८ मध्ये श्रद्धा निगमसोबत पहिले लग्न केले आणि हे लग्न अवघ्या एका वर्षातच तुटले. त्यानंतर त्याने अभिनेत्री जेनिफर विंगेटशी दुसरं लग्न केले आणि त्यांचेही नाते फार काळ टिकले नाही. अवघ्या २ वर्षांतच हे कपल वेगळे झाले. यानंतर करणच्या आयुष्यात बिपाशा बसू आली. त्यांनी २०१६ मध्ये लग्न केले आणि दोघांना आता देवी नावची एक मुलगी आहे. हे दोघेही खूप आनंदी आहेत.
जेनिफर विंगेट आणि करण सिंग ग्रोवरचे लग्न झाले होते. तेव्हा करण दुसऱ्या मुलीच्या बहाण्याने तिची फसवणूक करत होता. एकदा अभिनेत्रीला इतका राग आला की तिने सेटवर सर्वांसमोर करणच्या कानाखाली मारली होती. दरम्यान, २००८ मध्ये करणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अलोन' चित्रपटाद्वारे त्याला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामध्ये त्याने बिपाशा बसूसोबत काम केले होते. त्यानंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फाइटर'मध्ये त्याने काम केले. करणने 'BOSS: बाप ऑफ स्पेशल सर्व्हिसेस' या वेबसीरिजच्या माध्यमातून डिजिटल विश्वात पदार्पण केले. त्यानंतर २०२० मध्ये 'डेंजरस' या वेब सीरिजमध्ये त्याने दमदार कामगिरी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.