Jeetendra Kapoor And Hema Malini Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jeetendra Kapoor Birthday: जितेंद्र यांचे खरं नाव आहे वेगळंच, अभिनेत्याचे हेमा मालिनी यांच्यासोबत होणार होते लग्न पण...

Jeetendra Kapoor And Hema Malini: जितेंद्र यांच्या फिल्मी करिअरसोबत त्यांच्या लव्ह लाइफची जोरदार चर्चा झाली. त्यांचे हेमा मालिनीसोबत अफेअर होते पण त्यांचे लग्न झाले नाही. जितेंद्र यांनी एअर होस्टेस शोभा यांच्यासोबत लग्न केले.

Priya More

Jeetendra Kapoor Movie:

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र (Jeetendra) यांना बॉलिवूडचे 'जंपिंग जॅक' म्हणून ओळखले जाते. ६० ते ९० च्या दशकात त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्या काळामध्ये ते बॉलिवूडचे टॉप अभिनेते होते. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. त्यांनी आपल्या दमदार अभिनय आणि स्टाइलने प्रेक्षकांची मनं जिंकली. जितेंद्र यांच्या फिल्मी करिअरसोबत त्यांच्या लव्ह लाइफची जोरदार चर्चा झाली. त्यांचे हेमा मालिनीसोबत अफेअर होते पण त्यांचे लग्न झाले नाही. जितेंद्र यांनी एअर होस्टेस शोभा यांच्यासोबत लग्न केले. जितेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या पर्सनल लाइफ आणि लव्हस्टोरीविषयी जाणून घेणार आहोत..

खरं नाव होतं वेगळंच -

खूप कमी कमी लोकांना माहीत आहे की, जितेंद्र यांचा जन्म एका व्यापारी कुटुंबात झाला होता. जे इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करतात. जितेंद्र यांचा जन्म 7 एप्रिल 1942 मध्ये पंजाबच्या अमृतसर येखील कृष्णा कपूर आणि अमरनाथ यांच्या घरी झाला. आधी त्यांचे नाव रवी कपूर असे होते. चित्रपटामध्ये आल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलले. राजेश खन्ना आणि जितेंद्र हे लहानपणापासूनचे जवळचे मित्र होते. त्यांचे शालेय शिक्षण सीनियर सेबॅस्टियन गोवा हायस्कूलमध्ये झाले. यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन सिद्धार्थ कॉलेजमधून पूर्ण केले.

हेमा मालिनींशी होणार होते लग्न -

शोभा यांच्याशी लग्न करण्यापूर्वी जितेंद्र यांचे नाव अभिनेत्री हेमा मालिनीशी जोडले गेले होते. जितेंद्र आणि शोभा कपूरचे अफेअर खूप दिवसांपासून सुरू होते. पण त्याच दरम्यान बातमी आली होती की, जितेंद्र हेमा मालिनीच्या प्रेमात पडले आहेत. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण धर्मेंद्र यांना देखील हेमा मालिनी आवड होत्या आणि त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचे होते. धर्मेंद्र यांनीच जितेंद्र आणि हेमा यांचे लग्न मोडले होते. यानंतर जितेंद्र यांनी शोभासोबत लग्न केले. तर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले होते.

असा आहे फिल्मी प्रवास -

जितेंद्र यांनी 'नवरंग' चित्रपटात अभिनेत्री संध्याच्या बॉडी डबल म्हणून भूमिका साकारल्या होत्या. जितेंद्र यांनी 1964 मध्ये 'गीत गया पठारों' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. त्याचा हा चित्रपट हिट ठरला. पण 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फर्ज'चित्रपटामुळे त्यांना बॉलिवूड इंडस्ट्रीत चांगली प्रसिद्ध मिळाली. त्यानंतर त्यांनी 'हमजोली', 'जीने की राह', 'तोहफा', 'हिम्मतवाला', 'धरम-वीर', 'औलाद', 'हातिम ताई', 'आशा', 'जानी दुश्मन', 'अरपन', 'परिचय', 'खुशबू', 'संजोग', 'एक ही भूल', 'घर संसार' यासारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले. जितेंद्र यांनी ‘झलक दिखला जा’ आणि ‘डान्सिंग क्वीन’ सारख्या काही रिॲलिटी शोजचे जजही केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध, पुण्याच्या बालगंधर्व चौकात आंदोलन

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT