Amitabh Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan: राम मंदिर प्राणप्रतिष्ठापूर्वी बिग बींची आयोध्येत मोठी गुंतवणूक, घर बांधण्यासाठी खरेदी केला 14.5 कोटींचा प्लॉट

Ram Mandir Consecration Ceremony: 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये जवळपास 10,000 चौरस फूट क्षेत्रफळवर घर बांधण्याबाबत बोलणं झालं आहे. या प्लॉटची किंमत 14.5 कोटी रुपये इतकी आहे.

Priya More

Amitabh Bachchan Buy Plot In Ayodhya:

बॉलिवूडचे (Bollywood) 'महानायक' अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी अयोध्येमध्ये मोठी गुंतवणूक केली असल्याची बातमी समोर आली आहे. बिग बींनी अयोध्यामध्ये 14.5 कोटी रुपयांचा प्लॉट खरेदी केला आहे. या ठिकाणी बिग बी घर बांधणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. अयोध्येमध्ये प्लॉट खरेदी केल्यामुळे सध्या अमिताभ बच्चन हे चर्चेत आले आहेत.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचा जन्म प्रयागराजमध्ये झाला. त्यांनी मुंबईतील डेव्हलपर 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' द्वारे अयोध्येमध्ये 7 स्टार असलेला एन्क्लेव, द सरयू येथे एक मोठा प्लॉट खरेदी केला आहे. 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये जवळपास 10,000 चौरस फूट क्षेत्रफळवर घर बांधण्याबाबत बोलणं झालं आहे.

बिग बींनी अयोध्येमध्ये खरेदी केलेल्या या प्लॉटची किंमत 14.5 कोटी रुपये इतकी आहे. सरयूचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. त्याच दिवशी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम जन्मभूमी मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी अयोध्येतील सरयूसाठी द हाऊस ऑफ अभिनंदन लोढासोबत अध्यात्मिक राजधानीमध्ये आपले घर बांधण्याबाबत आनंद व्यक्त केला आहे. अमिताभ बच्चन यांची गुंतवणूक एन्क्लेव्हच्या नियोजित विकासामध्ये आहे. ज्यामध्ये ब्रुकफील्ड ग्रुपच्या मालकीच्या लीला पॅलेसेस, हॉटेलस आणि रिसॉर्ट्स यांच्या भागीदारीत 5 स्टार पॅलेस हॉटेल देखील असेल. त्याचे काम मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

'भोंदूबाबामुळे पुरोगामी महाराष्ट्राची बदनामी' खरातचे पाप, सरकारच्या डोक्याला ताप

Rahul Gandhi : नरेंद्र मोदी 100 टक्के ट्रम्पच्या कंट्रोलमध्ये; राहुल गांधींचा दावा

SCROLL FOR NEXT