Maidaan Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maidaan Final Trailer: 'एक हृदय, एक समज, एक विचार...', अजय देवगणने वाढदिवशी चाहत्यांना दिलं गिफ्ट, 'मैदान'चा फायनल ट्रेलर रिलीज

Maidaan Trailer Out: अजय देवगणने त्याचा मोस्ट अवेटेड स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट 'मैदान'चा दमदार ट्रेलर रिलीज केला आहे. मैदान चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Priya More

Maidaan Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आज आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या अजय देवगणवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. अशामध्ये अजय देवगणने वाढदिवशी चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे. अजय देवगणने त्याचा मोस्ट अवेटेड स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट 'मैदान'चा दमदार ट्रेलर रिलीज केला आहे. मैदान चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये या चित्रपटाचा फायनल ट्रेलर पाहून प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.

मैदान चित्रपटात अजय देवगण भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. ज्यामध्ये 1952 ते 1962 पर्यंतच्या दौऱ्याची कथा पडद्यावर दाखवली जाणार आहे. हा काळ फुटबॉलच्या बाबतीत चमकदार असल्याचे म्हटले जात होते. निर्माता-दिग्दर्शक हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजे एप्रिल महिन्यात प्रदर्शित करणार आहेत. अजय देवगणने मैदान चित्रपटाचा फायनल ट्रेलर X अकाऊंटवर शेअर करत एक अप्रतिम कॅप्शन लिहिले आहे. अजय देवगणने या पोस्टमध्ये लिहिले की, 'एक हृदय, एक समज, एक विचार, एस.ए. तुम्हीसुद्धा रहीम आणि त्याच्या टीम इंडियाच्या अकथित सत्य कथेचे साक्षीदार व्हा. या मैदानामध्ये 10 एप्रिल रोजी चित्रपटगृहात या.'

या चित्रपटाची कथा भारतीय फुटबॉल प्रशिक्षक आणि भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे अब्दुल रहीम यांची आहे. जे व्यवसायाने शिक्षक देखील आहेत. भारतातील प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ हा फुटबॉलच्या दृष्टीने सुवर्णकाळ होता, असे म्हटले जाते. सैय्यद अब्दुल रहीम यांना आपण फुटबॉल जिंकू याची खात्री कशी वाटते हे देखील या चित्रपटात दाखवले आहे. आपल्या टीमसाठी उत्साही खेळाडू एकत्र करण्यात प्रशिक्षकाची मेहनतही स्पष्टपणे दिसून येते. त्यांना फुटबॉल आणि त्याचे मैदान याशिवाय दुसरे काही दिसत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे.

सय्यद अब्दुल रहीम यांना भारतातील सर्वात क्रांतिकारी फुटबॉल प्रशिक्षक मानले जात होते. या चित्रपटाची कथा क्रीडाप्रेमी प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी तयार केला आहे. चित्रपटाला ज्येष्ठ संगीतकार ए.आर.रहमान यांनी संगीत दिले आहे. ईदच्या मुहूर्तावर म्हणजे १० एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांची टक्कर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT