Shaitaan Advance Booking Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shaitaan Advance Booking: अजय देवगण-आर माधवन ओपनिंग डेला धुमाकूळ घालणार, 'शैतान'ने रिलीजपूर्वीच केली बक्कळ कमाई

Priya More

Shaitaan Movie Collection:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर. माधवनचा (R Madhvan) 'शैतान' चित्रपट (Shaitaan Movie) रिलीज होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ८ मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हॉरर थ्रिलर 'शैतान' चित्रपटाने रिलीजपूर्वीच बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे कोट्यवधीची कमाई केली आहे. त्यामुळे रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

शैतान चित्रपटाचे सध्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. पहिल्या दिवसाच्या शोसाठी या चित्रपटाची ९८ हजार ९८३ तिकीटांची विक्री झाली आहे. या चित्रपटाने या तिकीटाच्या माध्यमातून आतापर्यंत २ कोटी २९ लाख रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून आणखी कमाई करण्याची शक्यता आहे. देशभरामध्ये या चित्रपटाचे ४,५५४ शो होणार आहेत. या चित्रपटाबाबत प्रेक्षक उत्सुक असून अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून हा चित्रपट ३ कोटींपेक्षा जास्त कमाई करेल असा अंदाज आहे.

हा चित्रपट गुजराती चित्रपट 'वश'चा रिमेक आहे. चित्रपटाची कथा जादूटोणा आणि वशिकरणावर आधारित आहे. सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रपटामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. तर आर माधवन शैतानाच्या भूमिकेत आहे. साऊथ अभिनेत्री ज्योतिकाने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण आपल्या कुटुंबाला काळ्या जादूपासून वाचवताना दिसणार आहे.

विकास बहलने 'शैतान' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विकास बहल यांनी याआधी 'क्वीन', 'चिल्लर पार्टी' आणि 'सुपर ३०' असे चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांचा अपकमिंग शैतान चित्रपट जादूटोणा, सस्पेन्स आणि गडद जगावर आधारित असून ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दावा केला आहे की, शैतान हा आतापर्यंतचा सर्वात भितीदायक चित्रपटांपैकी एक आहे. जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला तर यानंतर अनेक भितीदायक चित्रपट येण्याचा मार्ग मोकळा होईल.

'शैतान' चित्रपटामध्ये जे पाहायला मिळते ते म्हणजे, हा चित्रपट कथा आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनाला भिडेल. चांगली गोष्ट म्हणजे, या चित्रपटाचे बजेट फक्त ६० ते ६५ कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत जर हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला तर तो सुपरहिट म्हणता येईल. आतापर्यंत या चित्रपटाने केलेल्या तिकीटाची विक्री लक्षात घेता हा चित्रपट ओपनिंग डेला १० ते १२ कोटींची कमाई करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पुण्यात उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

Fact Check: 99 रुपयांत मिळणार दारू? सरकारने आणलं नवं मद्य धोरण? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा...

Tirupati laddu news : तिरूपतीच्या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल; आरोप-प्रत्यारोपांचा तडका, राजकीय फोडणी

SCROLL FOR NEXT