Aamir Khan Kiss Kiran Rao Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan Kiss Kiran Rao: मुलीच्या लग्नात आमिर खानने एक्स वाइफ किरण रावला केलं किस, पाहत राहिले सर्वजण; VIDEO व्हायरल

Aamir Khan Kiss Kiran Rao Video: आयरा आणि नुपूरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचदरम्यान आयराचे वडील आमिर खानचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

Priya More

Ira Khan And Nupur Shikhare Wedding:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार आमिर खानची (Aamir Khan) लाडकी मुलगी आयरा खान (Ira Khan) ३ जानेवारीला विवाहबंधनात अडकली. आयराने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्न केले. आयरा आणि नुपूरच्या लग्नासोहळ्याला (Ira Khan And Nupur Shikhare Wedding) दोघांच्याही जवळचे नातेवाई आणि मित्र परिवाराने हजेरी लावली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचदरम्यान आयराचे वडील आमिर खानचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

आयरा खानने ३ जानेवारीला नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर नुपूर शिखरे आता ऑफिशिअली मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा जावई झाला आहे. नुपूर शिखरे लग्नाला टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये पोहचला. नुपूर काही मित्रांसोबत तब्बल ८ किलोमीटरपर्यंत जॉगिंग करत लग्नाच्या ठिकाणी पोहचला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. नुपूरने या लूकमध्ये रजिस्टर लग्न केले. त्यानंतर फोटो सेशनसाठी तो शेरवानीमध्ये मीडियासमोर आला.

आयरा आणि नुपूरने रजिस्टर मॅरेज केल्यानंतर संपूर्ण कुटुंबासोबत फोटो काढले. यावेळी आमिर खानने त्याची एक्स वाइफ किरण रावला गालावर किस केले. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आमिर खान स्टेजवर आयरा आणि नुपूरसोबत फोटो काढण्यासाठी आलेल्या किरण रावजवळ जातो. किरण रावशी काही तरी बोलता बोलता तो तिच्या गालावर किस करतो. यावेळी किरण रावच्या शेजारी उभी राहिलेली नुपूरची आई आणि आमिर खानचा मुलगा जुनैद खान त्यांच्याकडे बघत राहतात.

आमिर खानने किरण रावला किस केल्याच्या व्हिडीओवर आता नेटिझन्स कमेंट्स करू लागले आहेत. यावर कमेंट्स करत एका युजरने लिहिले की, 'आमिर आणि किरणचा घटस्फोट झाला आहे ना?' तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'आमिर भाईला सॅल्यूट.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'जर घटस्फोट झाला आहे तर ही काय पद्धत आहे.'

दरम्यान, आमिर खानचे दोन लग्न झाले होते. त्याने दोन्ही पत्नींना घटस्फोट दिला आहे. पहिली पत्नी रीना दत्तासोबत त्याने १९८६ मध्ये लग्न केले होते. पण १६ वर्षांच्या सुखी संसारानंतर या कपलने २००२ मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर आमिर खानने २००५ मध्ये किरण रावसोबत दुसरं लग्न केले. पण त्यांचं देखील नातं टिकलं नाही. २०२१ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT