Ira Khan And Nupur Shikhare Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ira Khan And Nupur Shikhare Wedding: आयरा खान- नुपूर शिखरेच्या घरी लगीनघाई, प्री-वेडिंग फंक्शनला सुरूवात; फोटो व्हायरल

Ira Khan And Nupur Shikhare Pre-Wedding Photos: आयरा आणि नुपूरच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमाला आमिर खानची एक्स वाइक किरण राव देखील सहभागी झाली होती.

Priya More

Ira Khan Wedding:

बॉलिवूडचा (Bollywood) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेच अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरेच्या (Nupur Shikhare) लग्नाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. अखेर येत्या ३ जानेवारीला हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे. आयरा आणि नुपूरच्या प्री-वेडिंग फंक्शन्सना सुरूवात झाली आहे. आयरा आणि नुपूरच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमाला आमिर खानची एक्स वाइक किरण राव देखील सहभागी झाली होती.

आमिर खानच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे.आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खान लवकरच लग्न करणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये आयरा खान तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. यासोबतच इरा आणि नुपूरचे प्री-वेडिंग फंक्शन्सही सुरू झाले आहेत. या स्टार किडने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या फंक्शनचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

मंगळवारी आयरा आणि नुपूर शिखरे यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सची सुरुवात महाराष्ट्रीय पद्धतीने झाली. आयराने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये हा व्हिडीओ शेअर केला आहे. मंगळवारी रात्री आयने 'महाराष्ट्रीयन केळवन' मधील छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले. या कार्यक्रमात आयर आणि नुपूरच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवारांनी हजेरी लावली.

Ira Khan Insta Post

आयराने तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. या फंक्शनला आयराने लाल रंगाची साडी परिधान केली होती. सिंपल लूकमध्ये आयरा खूपच सुंदर दिसत होती. नुपूरने लाल रंगाचा कुर्ता पायजमा आणि सोनेरी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. नुपरने डोक्यावर फेटा बांधला होता. दोघेही कपल यावेळी खूपच क्यूट दिसत होते. महत्वाचे म्हणजे इरा आणि नुपूरच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये आमिर खानची एक्स वाइक किरण राव ही मुलगा आझादसोबत आली होती. या कार्यक्रमाला अभिनेत्री मिथिला पालकर सहभागी झाली होती. मिथिलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

Ira Khan Insta Post

दरम्यान, आमिर खानने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, 'आयरा आणि नुपूर पुढच्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत. ३ जानेवारीला आयरा आणि नुपूर लग्नगाठ बांधतील, असे आमिरने सांगितले होते. आयरा २६ वर्षांची आहे आणि ती बऱ्याच दिवसांपासून फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघांची एंगेजमेंट झाली होती. यावेळी दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे फ्रेंड्स हजर होते. एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT