12th Fail Actor Vikrant Massey Saam Tv
मनोरंजन बातम्या

69th Filmfare Awards: 69 व्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये '12 वी फेल'चाच बोलबाला, विक्रांत मेस्सीच्या चित्रपटाने इतके पुरस्कार केले नावावर

12th Film Movie Got Best Film Award: या फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यामध्ये '12वी फेल' चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर वर्चस्व गाजवले. विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) आणि मेधा शंकर स्टारर या चित्रपटाला 69 व्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

Priya More

Vikrant Massy 12th Fail Movie:

2023 मध्ये सुपरहिट ठरलेला आणि अजूनही सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे अभिनेता विक्रांत मेस्सीचा '12वी फेल' चित्रपट (12 th Fail Movie). या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अजूनही या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांच्या मनातील क्रेझ काही कमी झालेली नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. नुकताच पार पडलेल्या 69 व्या फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यामध्ये या चित्रपटाचीच चर्चा होती.

या फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यामध्ये '12वी फेल' चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर वर्चस्व गाजवले. विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) आणि मेधा शंकर स्टारर या चित्रपटाला 69 व्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह इतर अनेक कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले आहेत.

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12वी फेल'चित्रपटाला फिल्मफेअर 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. यासोबतच या चित्रपटाने अनेक कॅटेगरीतील पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट कॅटेगरीमध्ये '12वी फेल' या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी 'ॲनिमल', 'जवान', 'ओह माय गॉड 2', 'पठान' आणि 'रॉकी की रानी की प्रेम कहानी' या चित्रपटांचा सहभाग होता. पण या कॅटगरीमध्ये '12वी फेल'या चित्रपटाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबतच '12वी फेल'च्या विधू विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही देण्यात आला.

त्याचवेळी, 12वी फेल चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन या कॅटेगरीमध्ये देखील पुरस्कार देण्यात आले आहेत. याशिवाय 12वी फेल या चित्रपटासाठी विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (समीक्षक) पुरस्कार देखील देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, 12वी फेल हा चित्रपट 2023 वर्षातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाचा 69 व्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये देखील बोलबाला होता.

दरम्यान, 69 व्या फिल्मफेअर अवॉर्डची (69th Filmfare Awards) सध्या सगळीकडे चर्चा आहे. नुकताच गुजरातच्या गांधीनगर येथे 69 वा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा पार पडला. दोन दिवसांचा हा अवॉर्ड सोहळा खूपच धुमधडाक्यामध्ये पार पडला. रविवारी संध्याकाळी म्हणजेच २९ जानेवारीला फिल्मफेअर अवॉर्ड्सचा मुख्य कार्यक्रम पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या हटके आणि आकर्षक ड्रेसिंग स्टाइलमध्ये हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यामध्ये रणबीर कपूरला 'ॲनिमल'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर आलिया भट्टला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT