Aamir Khan Support China Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan Support China: अमिरला भारतात चीनी चित्रपटाचं प्रमोशन करणं पडलं महागात; प्रमोशनल व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Aamir Khan China Love: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या आमिरने एका चिनी चित्रपटाचे प्रमोशन केले. आता अभिनेत्याला तेच प्रमोशन करणं भोवलं आहे.

Chetan Bodke

Aamir Khan Trolled on China: भारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंध फारच बदलले आहे. सोबतच भारत सरकारने अनेकदा चायनीज गोष्टींवर, ॲप्सवर अनेकदा बहिष्कार टाकाला आहे.

दरम्यान, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या आमिरने एका चिनी चित्रपटाचे प्रमोशन केले. आता अभिनेत्याला तेच प्रमोशन करणं भोवलं आहे. सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना ‘Never Say Never’ हा चिनी चित्रपट पाहण्याची विनंती केली. चीनच्या सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट लावण्यात आला असून हा चित्रपट पाहायला हवा, असं अमिर म्हणाला आहे

आमिरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून सध्या अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. कारण चीनमध्ये भारतीय चित्रपट ‘भारतीयन’वर बहिष्कार टाकण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर आमिर खानचं चायनीज प्रेम पाहून नेटकरी त्याला तुफान ट्रोल करीत आहेत.

वास्तविक ग्लोबल टाइम्सने आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ग्लोबल टाईम्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो त्याचा मित्र आणि मोठा चीनी दिग्दर्शक बाओकियांगच्या ‘Never Say Never’ या चित्रपटाला सपोर्ट करताना तो दिसत आहे. हा चित्रपट ६ जुलै रोजी चीनमध्ये प्रदर्शित झाला.

व्हिडिओमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करताना आमिर खान म्हणतो, ‘Never Say Never’ या चित्रपटाचा मी ट्रेलर पाहिला. ट्रेलर खूपच सुंदर आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट खूपच प्रेरणादायी, भावनिक आहे, असे वाटते. माझ्या आवडणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. नेहमीच मला असे चित्रपट करायला आवडतात.

सोबतच त्या व्हिडिओत अमिरने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. सोबतच त्याने चीनी प्रेक्षकांनी जास्तीत जास्त हा चित्रपट पाहावा अशी मी प्रार्थना करेल. आता आमिरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

हा व्हिडिओ पाहून ट्रोलर्सने जोरदार कमेंट केल्या आहेत. काही युजर्सने अमिरला तू मोदींच्या विरोधात आहे का? असं म्हणाले आहे. तर, काहींनी त्याला चीन आणि पाकिस्तानवरील प्रेम उतु जात आहे. असा देखील टोमणा मारलाय.

आमिर खानचे चीनमध्ये प्रचंड चाहते असून त्याचे चित्रपट चीनमध्ये धमाकेदार कमाई करतात. धमाकेदार कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ३ इडियट्स आणि दंगल या दोन चित्रपटांचे नाव आवश्य घेतले जाते. अमिर खानच्या या चित्रपटांनी चीनमध्येच १५०० कोटींहून अधिकची कमाई केली होती. अमिरच्या चित्रपटांना चीनमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तो चीन संबंधित कोणत्याही नकारात्मक बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाही. याशिवाय ‘भारतीयन’ या भारतीय चित्रपटाला चीनमध्ये विरोध होत आहे. या चित्रपटात भारत आणि चीनमधील संबंध चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT