aamir khan to play role in ujjwal nikam biopic Saam Tv
मनोरंजन बातम्या

Advocate Ujjwal Nikam Biopic: ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर, मुख्य भूमिकेत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट ?

Advocate Ujjwal Nikam Biopic: अभिनेता आमिर खान प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

Chetan Bodke

Advocate Ujjwal Nikam Biopic

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ गेल्या वर्षी अर्थात २०२२ मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर फारशी जादू चालली नाही. चित्रपट प्रदर्शित होताच त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या चित्रपटानंतर अभिनेता आमिर खानने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. जरी त्याने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता, तरी सुद्धा तो निर्मिती क्षेत्रातून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होता. आता, आमिर पुन्हा एकदा दमदार कमबॅक करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खान चित्रपट निर्माता दिनेश विजानच्या एका बायोपिकमध्ये तो दिसण्याची शक्यता आहे.

भारतीय सिनेसृष्टीत, आमिर खानची खरी ओळख मिस्टर परफेक्शनिस्ट असून तो कायमच बायोपिकसाठी ओळखला जातो. अमिरने त्याच्या सिनेकारकिर्दित ‘मंगल पांडे: द रायझिंग’मध्ये त्याने मंगल पांडे यांची प्रमुख भूमिका साकारली होती. तेव्हापासून आमिर कायमच आपल्या भारदस्त अभिनयासाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता आमिर खान ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित उज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती दिनेश विजन करणार आहे

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरण, गुलशन कुमार हत्या, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, २६- ११ दहशतवादी हल्ला, शक्तीमिल बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार अशा अनेक विविध प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिलं. लवकरच येत्या काही दिवसात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचा जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या चरित्र्यपटाचे दिग्दर्शन दिनेश विजन करणार आहेत, सोबतच चित्रपटाची निर्मिती देखील दिनेश विजनच करणार आहे. सध्या चित्रपटातील कलाकारांचा शोध घेण्याचे काम सुरू असून आमिर खान देखील चित्रपटामध्ये दिसणार असल्याची शक्यता आहे.(Bollywood Film)

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या दिग्दर्शक आणि निर्माता दिनेश विजन चित्रपटामधील कलाकारांचा शोध घेत आहे. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत आमिरचं नाव समोर आलं असून तोच या भूमिकेकरिता योग्य असल्याचं मत दिनेश विजनचं आहे.

सोबतच सध्या अमिरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, आमिर खानने ‘लाल सिंग चड्ढा’नंतर बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आणि ट्रोलिंगचा प्रचंड सामना केल्यानंतर त्याने अभिनयामध्ये ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. द चॅम्पियन्स, जय जय जय है, प्रितम प्यारे, लापता लेडीज आणि लव्ह टुडे या पाच चित्रपटाच्या रिमेकची निर्मिती आमिर खान करण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

IAS Officers Transferred: ऐन निवडणुकीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली?

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

SCROLL FOR NEXT