Bollywood Movie Theater Released August Month Saam Tv
मनोरंजन बातम्या

August Month Released Movie : 'स्त्री २', 'उलझ', 'बारदोवी' सह अनेक चित्रपटांचा होणार बंपर धमाका, ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांसाठी खास चित्रपटाची मेजवानी

Theater Released August Month Movie : जुन आणि जुलै महिन्यामध्ये, बॉक्स ऑफिसवर फार कमी चित्रपट रिलीज झाले आहेत. पण येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये, प्रेक्षकांच्या भेटीला तब्बल ११ चित्रपट रिलीज होणार आहेत.

Parag Kharat

जुन आणि जुलै महिन्यामध्ये, बॉक्स ऑफिसवर फार कमी चित्रपट रिलीज झाले आहेत. पण येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये, प्रेक्षकांच्या भेटीला ४ किंवा ५ चित्रपट नाही तर, तब्बल ११ चित्रपट रिलीज होणार आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये बॉक्स ऑफिसवर चित्रपटांचा बंपर धमाका होणार आहे. या ११ चित्रपटांमध्ये २ हॉरर चित्रपटही आहेत. या याबरोबरच कॉमेडी, रोमँटिक आणि काही सस्पेन्स थ्रिलर चित्रपटही प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा विचार करत असाल तर ही पर्वणी तुमच्यासाठी आहे. विश्वास बसला नाही ना चला तर मग बघुयात कोणकोणते चित्रपट आणि कधी चित्रपटगृहात येणार आहेत ते...

२ ऑगस्ट

२ ऑगस्टला ३ हिंदी सिनेमे चित्रपटगृहात रिलीज होणार आहेत. या यादीमध्ये, जान्हवी कपूरचा 'उलझ' , तब्बू आणि अजय देवगणचा 'औरो में कहा दम था' आणि छाया कदमचा 'बारदोवी' या चित्रपटांचा समावेश आहे. रिलीज होणारे हे तिनही चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे आहेत.

९ ऑगस्ट

९ ऑगस्टला थिएटरमधये २ हिंदी चित्रपट थिएटरमध्ये धडकणार आहेत. हे दोन्ही चित्रपट मोठ्या बजेटचे नाहीत. परंतु या चित्रपटात काम करणारे कलाकार चांगले आहेत. 'आलीय बासू गायब हैं' चित्रपटात प्रमुख भूमिकेत सलीम दिवाण, रायमा सेन, विनय पाठक आहेत. तर 'घुसपेठीया' चित्रपटात उर्वशी रौतेला, अक्षय ओबेरॉय आणि विनीत कुमार सिंह असणार आहे.

१५ ऑगस्ट

स्वातंत्र्य दिवसाच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिवर चांगलाच धमाका होणार आहे. या दिवशी थिएटरमध्ये तब्बल 5 चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत. 'स्त्री २' चित्रपटामध्ये, श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि तम्मना भाटिया कलाकार आहेत. तर खेळ खेळ में' चित्रपटात अक्षय कुमार, तापसी पन्नू‌, फरदीन खान आणि एमी विर्के आहेत.

तर 'डब्बल इस्मार्ट' चित्रपटात संजय दत्त दिसणार आहे. 'वेधा' चित्रपटात शर्वरी वाघ, आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर 'थंगालान' चित्रपटात चीयान विक्रम आहे. १५ ऑगस्टला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर पुढे काही दिवस सुट्ट्या आहेत.

त्यामुळे पुढच्या पाच दिवसांमध्ये या ५ पैकी कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अशाप्रकारे चित्रपट प्रेमींना चित्रपटांची पर्वणी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT