Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Box Office Day 4 Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

व्हॅलेंटाईन वीकमध्ये शाहिद-क्रितीच्या 'Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya' ची जोरदार कमाई; जगभरात चौथ्या दिवशी किती केली कमाई?

Chetan Bodke

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Box Office Day 4 Collection

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉन (Kriti Senon)च्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Movie) चित्रपटाला फक्त देशातच नाही तर जगभरामध्ये चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय.

९ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. अमित जोशी आणि आराधना साह दिग्दर्शित 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपट रिलीजच्या चौथ्या दिवशी चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये मोठी गर्दी केलेली पाहायला मिळतेय. चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी किती कमाई केली, जाणून घेऊया. (Bollywood Film)

शाहिद आणि क्रितीचा हा हटके लव्हस्टोरी असणारा चित्रपट व्हॅलेंटाईन विकमध्ये रिलीज झाला आहे. प्रेक्षकांसोबत समीक्षकांनी चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. कोट्यवधी रूपयांमध्ये चित्रपटाची निर्मिती झाली असून फक्त देशातच नाही जगभरामध्ये चित्रपट दिलासादायक कमाई करीत आहे.

नुकतंच ट्रेड ॲनालिस्ट सॅकल्निकने चित्रपटाच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. चित्रपटाने चौथ्या दिवशी तीन कोटींच्या आसपास कमाई केली आहे. चित्रपटाने एकूण चार दिवसांत ३०. ८५ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरामध्ये एकूण ५२.५ कोटींची कमाई केली आहे. (Bollywood News)

पहिल्या दिवशी ६.७ कोटी, दुसऱ्या दिवशी ९. ६५ कोटी, तिसऱ्या दिवशी १०. ७५ कोटी तर चौथ्या दिवशी ३ .७५ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत असून प्रेक्षक चित्रपटाला उत्तम प्रतिसाद आहे.

शाहिद आणि क्रितीसाठी हा चित्रपट खास ठरला आहे. कारण त्यांचे आधीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत. 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine's Day) निमित्त माणूस आणि रोबोटच्या लव्हस्टोरीवर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. ही लव्हस्टोरी खरंतर शाहिद आणि क्रितीतील आहे. क्रितीने चित्रपटामध्ये एका रोबोटचे पात्र साकारले. (Bollywood Actor)

दरम्यान, मॅडॉक फिल्मने चित्रपटाची निर्मिती केली आहे. ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साहने केले आहे. या चित्रपटामध्ये शाहिद आणि क्रिती व्यतिरिक्त बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील असणार आहे. त्याच्यासोबत डिंपल कपाडिया आणि राकेश बेदी देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. चित्रपटातील डायलॉगसोबतच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT