Stree 2 Trailer Out  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Stree 2 Trailer : ‘सरकटे का आतंक...’, घाबरता घाबरता हसवणार ‘स्त्री २’चा धमाकेदार ट्रेलर, पाहा Video

Stree 2 Official Trailer Out : २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाचा सीक्वेल रिलीज झालेला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पार्टने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता त्यानंतर ‘स्त्री २’ रिलीज होणार आहे.

Chetan Bodke

२०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाचा सीक्वेल रिलीज झालेला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पार्टने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता त्यानंतर ‘स्त्री २’ रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. १५ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज झाला असून ट्रेलरमध्ये जबरदस्त सीन्सने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार रावच्या ‘स्त्री २’ ची चर्चा सुरु होती. ‘स्त्री २’च्या ट्रेलरमध्ये चंदेल गावातली गोष्ट दाखवण्यात आली आहे. पुन्हा एकदा गावातल्या लोकांमध्ये ‘स्त्री’ परत आल्याची दहशत पाहायला मिळत आहे. खरंतर ‘स्त्री’ परत आल्यामुळे लोकांमध्ये, प्रचंड भीती आहे. ट्रेलरमध्ये, श्रद्धा पुन्हा एकदा स्त्रीच्या भूमिकेत दिसत असून चंदेल गावातल्या लोकांची ती रक्षा करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला चित्रपटाचं वेगळं कथानक पाहायला मिळेल.

‘स्त्री’मध्ये एका महिलेची आत्मा चंदेल गावातील पुरुषांचा सूड घेते, असे दाखवण्यात आले होते. त्यानंतर तिची अपूर्ण इच्छा पूर्ण करून तिला शांत केलं जातं. आता ‘स्त्री’च्या सीक्वेलमध्ये एक पुरुष आत्मा दाखवण्यात आला आहे. तो गावातल्या मुलींना संपवण्याचा प्रयत्न करतो, असं दाखवलंय. अखेर गावकरी एका गाव गुंडाची आणि त्याच्या गँगची मदत घेताना दिसतात. या ट्रेलरमधील संवादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. कॉमेडी- थ्रिलर चित्रपटाच्या काही दृश्यांनी तुमचीही नक्कीच घाबरगुंडी उडेल.

या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिका आहेत. त्याशिवाय टॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ही सुद्धा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे, पण ती चित्रपटामध्ये पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला भारतासह जगभरात रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT