Sajini Shinde Ka Viral Video Review Saam TV
मनोरंजन बातम्या

Sajini Shinde Ka Viral Video Review: समाजातील वास्तव दाखवणारा 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' कसा आहे? वाचा रिव्ह्यू

Bollywood Movie: दिग्दर्शक मिखिल मुसळेने 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' चित्रपटाची रहस्यमय कथा अत्यंत उत्तमरित्या मांडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nimrat Kaur, Bhagyashree Movie Review:

सोशल मीडिया आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. सगळ्याच वयातील मंडळी सोशल मीडियाचा सरार्स वापर करताना दिसतात. सोशल मीडिया तरुणांनाही मुलभूत गरज झाली आहे.

सोशल मीडियाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही फायदे आहेत. परंतु सोशल मीडियाचा दुरुपयोग करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियावरील अकाउंट हॅक करून त्या व्यक्तीला धमकावणं, त्याच्याकडून पैशाची मागणी करणं असे अनेक उद्योग सध्या सोहळ मीडियाचा वापर करून केले जात आहेत.

तर काही वेळा एखादा फोटो किंवा व्हिडीओ स्वार्थसाठी किंवा बदला घेण्याच्या भावनेने व्हायरल केला जातो. हाच विषय घेऊन एक हिंदी चित्रपट आपल्या भेटीला आला आहे. 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' असे या चित्रपटाचे नाव आहे. एका व्हिडीओमुळे एखाद्याच्या जीवनावर काय परिणाम होतो याचे विदारक चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.

जुन्या आणि नव्या पिढीचे विविध विचार, सोशल मीडियाचा वाढलेला वापर आणि त्याचा समाज जीवनावर होणारा परिणाम, शैक्षणिक संस्थाचालकांचा आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी चाललेला खटाटोप, त्याचा शिक्षकांवर वाढणारा दबाव आणि या दबावामुळे त्याचे होणारे दुष्यपरिणाम असे अनके मुद्दे या चित्रपटात (Movie) दिग्दर्शक मिखिल मुसळे यांनी मांडले आहेत.

आजच्या समाजातील वास्तव मांडताना कुठेही अतिशयोक्ती न करता ही सरळ व साधी कथा त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडली आहे. विज्ञानची शिक्षिका सजिनी (राधिका मदन) भोवती ही कथा फिरते. सजनी ही महाराष्ट्रातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगी आहे. आई-वडील आणि भाऊ यांच्यासह एकत्रित कुटुंबात ती राहात असते.

चित्रपटाचा कथा

एके दिवशी सजिनी शाळेच्या सहलीला सिंगापूरला जाते. त्याच दिवशी तिचा वाढदिवस देखील असतो. तेथे तिच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन केले जाते. त्या पार्टीमध्ये ती मुलांबरोबर डान्स करते. तिचा या पार्टीमधील एक व्हिडीओ व्हायरल होतो.

त्या व्हिडीओमुळे प्रचंड गदारोळ सुरू होतो. त्या शाळेची मुख्याध्यापिका कल्याणीवर (भाग्यश्री) चहुबाजूंनी दबाव येतो. त्यामुळे तिला शाळेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सजिनीला शाळेतून काढावे लागते. त्यामुळे निराश व हताश झालेली सजिनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिते आणि अचानक गायब होते.

तिच्या अशा अचानक गायब होण्यामुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जातात. पोलिस त्याचा तपास सुरू करतात. तिने लिहिलेल्या पोस्टमध्ये वडिलांचे (सुबोध भावे) आणि होणाऱ्या पतीच्या (सोहम मजुमदार) नावाचा उल्लेख केलेला असतो. त्यामुळे पोलिस अधिकारी बेला (निम्रत कोर) आणि तिचा सहकारी राम पवार (चिन्मय मांडलेकर) यांच्या संशयाची सुई या दोघांभोवती फिरते. तपासाची चक्रे वेगाने फिरू लागतात आणि अखेर एकेक गुपिते बाहेर येऊ लागतात. (Latest Entertainment News)

दिग्दर्शक मिखिल मुसळेने ही रहस्यमय कथा अत्यंत उत्तमरित्या मांडली आहे. चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. राधिका मदन, सुबोध भावे, निम्रत कौर, भाग्यश्री, किरण करमरकर, सुमित व्यास, सोहम मजुमदार, चिन्मय मांडलेकर अशा सगळ्याच कलाकारांनी (Celebrity) आपापल्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत. विशेष बाब म्हणजे निम्रतने पोलिस अधिकाऱ्याची भूमिकेत अप्रतिमरित्या साकारली आहे.

चित्रपट रहस्यमय असल्यामुळे चित्रपटातील पार्श्वसंगीत हे महत्त्वाचा भाग आहे आणि ते कथेला साजेसेच झालेले आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. सिनेमॅटोग्राफर त्रिभुवन बाबू सादीनेनी यांना याचे क्रेडिट द्यावे लागेल. मात्र चित्रपटातील संगीत समाधानकारक नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT