Ram Setu Poster Twitter/ @Ramesh Bala
मनोरंजन बातम्या

Ram Setu Trailer: अक्षय कुमार उलगडणार 'राम सेतू'चं रहस्य; ट्रेलर पाहून अचंबित व्हाल!

अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेल्या 'राम सेतू'चे ट्रेलरमधून अनेक रहस्यमयी गोष्टी उलगडणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अक्षय कुमारचा (Bollywood Actor) बहुप्रतिक्षित 'रामसेतु' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. (Bollywood) नुकताच काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टर पासून चित्रपटाबद्दल उत्सुकता अधिकच वाढत होती. कारण चित्रपटातील पोस्टर पाहून चित्रपटात काही रहस्यमय गोष्टींचा खुलासा होणार हे पोस्टरच्या माध्यमातून दिसत होते. चित्रपटात अक्षयसोबत मुख्य भूमिकेत नुसरत भरुचा, जॅकलिन फर्नांडिसही (Bollywood Actress) आहेत. रामसेतुची कथा नास्तिक पुरातत्वशास्त्रज्ञ आर्यन कुलश्रेष्ठ म्हणजेच अक्षय भोवती चित्रपटाची कथा फिरते. पौराणिककथेचे रामसेतुचे अस्तित्व सिद्ध करण्याचे काम आर्यनला मिळते. (Marathi Entertainment News)

आर्यन पौराणिक कथा आणि विज्ञान तंत्रज्ञानातून 'रामसेतु'चा शोध लागतो. आर्यन रामसेतुबद्दल माहिती शोधताना सत्य आणि कल्पनाच्या माध्यमातून विचार करीत आहे. त्याला अनेक कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागते. तो अनेक गोष्टींना विज्ञानाच्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न करत असतो. ट्रेलरमध्ये अनेक रहस्य उलगडणारे दृश्य आणि रामसेतुबद्दल महत्वपूर्ण माहिती आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सोबतच आर्यन आणि त्याचे साथीदार पौराणिक कथा आणि विज्ञानाची सांगड घालत कशाप्रकारे आपले उत्तर शोधतात हे चित्रपट पाहिल्यवरच समजेल.

आर्यन अनेक हजारो वर्ष जुना इतिहास जाणुन घेण्याचा प्रयत्न करत आहे. रामसेतुजवळ जाण्यासाठी जॅकलिनही त्याला मदत करते. ती त्याला कशाप्रकारे मदत करते हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. अक्षय कुमारने चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत बोलतो की, "राम सेतूची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची उत्सुकता लागली होती. त्यातील काही प्रश्नांची उत्तरे आता तर काही उत्तरे चित्रपटात नक्की मिळतील. या दिवाळीत आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासह राम सेतूच्या जगाचा एक भाग होऊ या."

अक्षय कुमार आपल्या ट्विटमध्ये बोलतो की, हा चित्रपट 25 ऑक्टोबरलाच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर 'थँक गॉड' देखील रिलीज होणार आहे. दोन्ही चित्रपट देवाशी संबंधितच आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे किती प्रेम मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT