M.S.Dhoni: आधी क्रिकेट विश्व गाजवले आता साकारणार नवी भूमिका; चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मनोरंजन विश्वात पदार्पण केले आहे. त्याने स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले आहे.
Dhoni Production House Image
Dhoni Production House ImageTwitter/ @LetsCinema
Published On

मुंबई: महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) उच्चारता क्षणी डोळ्यांसमोर उभा राहतो २०११ चा वर्ल्डकप सोहळा (World Cup) . धोनीने आत्तापर्यंत अनेक क्रिकेटचे मैदानं गाजवले आहेत. त्याच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा चित्रपटही सर्वांनाच खूप आवडला. त्या चित्रपटातील धोनीची भूमिका सुशांत सिंग राजपूतने साकारले होते. आपल्या शांत आणि हुशार मनाने अख्ख्या देशाचे क्रिकेट विश्वात नेतृत्व केले. १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यात आली. पण सध्या महेंद्र आयएपीएलमध्ये खेळत आहे. (IPL) (Bollywood) (Bollywood Actor)

Dhoni Production House Image
Rahul Koli: ऑस्करसाठी नामांकित सिनेमाच्या बालकलाकाराचे निधन; अवघ्या १५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नेहमीच सोशल मीडियावर तो सक्रिय असतो. आपल्या परिवारासोबत आवडत्या गोष्टी करताना त्याच्या चाहत्यांनी त्याला बऱ्याचदा पाहिले आहे. पुन्हा एकदा सोशल मीडियावर आयुष्यातील नव्या निर्णयामुळे तो चर्चेत आला आहे. त्याने स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस (Production House) सुरु केले आहे. त्यामुळे तो लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. धोनीने स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस उघडले आहे. 'धोनी एन्टरटेन्मेंट' (Dhoni Entertainment) या नावाने प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात केली आहे. रविवारी त्याने 'LetsCinema' असे ट्विट करत चाहत्यांना माहिती दिली. धोनीने शेअर केलेल्या फोटोत तो आणि त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव दिसत आहे.

त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचे पोस्टर समोर आले असून त्याअंतर्गत तेलुगू, मल्याळम, तामिळमध्ये चित्रपट बनवले जाणार आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून जरी निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळत आहे. आयपीएलमध्ये धोनी 'चेन्नई सुपर किंग्ज' कडून खेळत आहे. त्यामुळे त्याच्या दाक्षिणात्य राज्यांमध्ये सर्वाधिक चाहतावर्ग आहे. तसेच तो सध्या एक जाहिरातमुळेही चर्चेत आहे. OREO बिस्किट त्याने टी २० वर्ल्डकप २०२२ च्या आधी लॉंच केले होते. धोनी युवराज आणि सचिन सोबतही जाहिरातीत झळकला होता.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com