Pathaan Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan 3 Day: 'पठान'ची गती मंदावली, तिसऱ्या दिवशी मोडू शकला नाही बाहुबली 2- दंगलचा रेकॉर्ड

प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी 'पठान'ची जादू बॉक्स ऑफिसवर फिकी पडली.

Pooja Dange

Pathan 3 Day Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर आगमन झाले. प्रदर्शित होताच त्याच्या 'पठान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉयकॉट बॉलिवूड आणि बॉयकॉट पठान सोशल मीडियावर ट्रेंड होत असताना या चित्रपटाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचे बिग बजेट चित्रपट देखील बॉयकॉट ट्रेंडमुळे फ्लॉप झाले. पण 'पठान' हे सगळ्या गोष्टी मागे टाकल्या आहेत.चला तर पाहूया 'पठान'चे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन.

'पठान' चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या 'फर्स्ट डे फास्ट शो' बुकिंग केले होते. प्री-बुकिंगमध्येच या चित्रपटाने बरीच कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या दोन दिवसात या चित्रपटाने १२७.५० कोटींचा गल्ला जमावाला होता. या चित्रपटाने कलेक्शनच्या बाबतीत जगभरात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बॉलिवूडला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अशाच एका दमदार चित्रपटाची गरज होती.

भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील 'KGF: Chapter 2' हा प्रदर्शनाच्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट होता. 'केजीएफ २'च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी ५३.९५ करोडची कमाई केली होती. यशाच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉलिवूड चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले होते. 'केजीएफ २'नंतर हृतिक रोशन 'वॉर'ने पहिल्या दिवशी ५३.३५ करोडचा एकदा पार केला होता.

तिसऱ्या दिवशी मात्र 'पठान'ची जादू चालली नाही. शुक्रवार हा शेवटचा कार्यालयीन दिवस असल्याने 'पठान' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जास्त गर्दी खेचता आली नाही. तिसऱ्या दिवशी चित्रपटाला ३४-३६ कोटीची कमाई करण्यात यश मिळाले आहे. तर संजू-४६.७१ करोड, बाहुबली २- ४६.५ करोड, केजीएफ २- ४२.९ करोड, टायगर जिंदा है- ४५.५३ करोड आणि दंगल- ४१.३४ करोडचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. या सर्व चित्रपटांच्या प्रदर्शच्या तिसऱ्या दिवशी हॉलिडे होता.

'पठान' चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी ७० करोडची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन २३५ करोड इतके होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT