Pathaan 12th day collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan Movie 12th Day Collection: १२व्या दिवशी शाहरुखच्या 'पठान'चा गाजावाजा, न भूतो न भविष्यति असे आहे चित्रपटाचे कलेक्शन

१२ दिवस 'पठान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे.

Pooja Dange

Pathan Movie 12th Day Box Office Collection: 'पठान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घेतला आहे. गेले १२ दिवस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचा हाऊस फुलचा बोर्ड उतरू दिला नाही. अनेक महिन्यांनी बॉलिवूडमध्ये चित्रपटाने इतकी कमाई केली आहे.

शाहरुखचा या चित्रपटाचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. १२ दिवस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. तसेच अनेक रेकॉर्ड मोडीत काढून नवीन रेकॉर्ड बनवले आहेत. दुसऱ्या वीकेंडला देखील या चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे.

'पठान' चित्रपटाचे दुसऱ्या आठवड्यातील कलेक्शन जाहीर झाले आहे. तरण आदर्श यांनी ट्विट करत 'पठान'चे कलेक्शन सांगितले आहे. शुक्रवारी १३.५० करोड, शनिवारी २२.५० करोड आणि रविवारी २७.५० करोडची कमाई 'पठान' चित्रपटाने केली आहे.

रविवारी म्हणजे बाराव्या दिवशी या चित्रपटाने २७.५० करोडची कमाई केली आहे. तर भारतातील या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ४२९.९० करोड इतके झालेआहे.

भारतासह या चित्रपटाने परदेशात सुद्धा भरपूर कमाई केली आहे. ट्रेड अनॅलिस्ट रमेश बाला यांच्या मते 'पठान' जगभरात ८५० करोडचा टप्पा पार केला आहे. १२ दिवसात ८५० करोडचा टप्पा पार करणाऱ्या 'पठान' चित्रपटाचे यश यावरून आपल्या लक्षात येईल.

'पठान' चित्रपट भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. शाहरुखच्या या चित्रपटाने अमीर खानच्या 'दंगल' चित्रपटाला देखील कलेक्शनच्या बाबतीत मागे टाकले आहे. अजूनही हा चित्रपट चित्रपटगृहांवर कब्जा करून आहे.

४ वर्षांनी प्रदर्शित झालेला शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक होते. त्यांनी त्याला दिली साथ म्हणजेच 'पठान'चे यश आहे. यासाठी शाहरुखने त्यांच्या चाहत्यांचे अनेकदा आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वर्सोवा- अंधेरी मेट्रोत तांत्रिक बिघाड,प्रवाशांची घाटकोपर स्टेशनवर गर्दी

Marathi-Hindi : आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं

Ukshi waterfall : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा, रत्नागिरीतील अनमोल सौंदर्य

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT