Aranmanai 4 Movie Poster Saam TV
मनोरंजन बातम्या

Aranmanai 4 Hindi Trailer: १०० कोटींची कमाई केलेल्या 'अरनमनाई ४'चा हिंदी ट्रेलर रिलीज, हॉरर आणि कॉमेडीचा होणार जबरदस्त तडका

Chetan Bodke

टॉलिवूड चित्रपटांची नेहमीच बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना स्टारर 'अरनमनाई ४' चित्रपट रिलीज झालेला आहे. हा चित्रपट मे २०२४ मध्ये तामिळ भाषेत रिलीज झालेला आहे. बॉक्स ऑफिसवर तामिळ भाषेत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत या चित्रपटाचा समावेश झालेला आहे. अशातच आता हा चित्रपट हिंदी भाषेतही रिलीज होणार आहे. 'अरनमनाई ४' चित्रपट थिएटरमध्ये ३१ मे रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचा हिंदी भाषेतीलही ट्रेलर रिलीज झालेला आहे.

हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. 'अरनमानाई ४'चं दिग्दर्शन सुंदर सी. यांनी केलं असून चित्रपटाची निर्मिती खुशबू सुंदर, एसीएस अरुण कुमार, साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळली आहे. बाक नावाच्या भयानक भूताच्या विश्वात नेणारा 'अरनमानाई ४' पूर्व भारतीय लोककथांच्या सफरीवर नेणारा आहे. चित्रपटाचे कथानक तामिळनाडूच्या कोवूरमधील रहस्यमय पार्श्वभूमीवर आधारलेला चित्रपट कुटुंबातील चांगल्या आणि वाईट शक्तींमधील संघर्षाचे चित्रण करतो.

२०२४ मधील तामिळ भाषेतील हिट चित्रपटांच्या यादीत या चित्रपटांचा समावेश करण्यात आलेला आहे. चित्रपटाने नुकताच जगभरात १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. IMDb नुसार, चित्रपटाचे बजेट अंदाजे ३० कोटी रुपये आहे. आता हा चित्रपट बॉलिवूड प्रेक्षकांचेही मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेला आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना व्यतिरिक्त, सुंदर सी, रामचंद्र राजू, संतोष प्रताप, कोवई सरला, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश, दिल्ली गणेश आणि के.एस. रविकुमार आहे. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सुंदर सी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

Walnut Benefit: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे

Ladki Bahin Yojana : बँकांची चूक झाली की काय? महिलांच्या खात्यात जमा होतायत ४५०० रुपये, वाचा खरं कारण

Jammu And Kashmir : निवडणूक निकलाआधी दहशतवाद्यांचा डाव उधळला; भारतीय लष्कराने केली शस्त्रे आणि स्फोटके जप्त

Diabetes Control: मधुमेह नियंत्रित ठेवायचाय? 'या' रंगाचे तीळ ठरतील फायदेशीर...

SCROLL FOR NEXT