मुंबई: सध्या अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही चित्रपट प्रेक्षकांच्या चांगले पसंतीस येत आहेत. तर काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनातून उतरत आहेत. आता नव्या वर्षातील आगामी चित्रपटांची प्रेक्षकांना ओढ लागलेली आहे (Bollywood). नव्या वर्षातील चित्रपट तसेच नवनवे विषय काय असणार याची साऱ्यांनाच चाहूल लागलेली दिसत आहे. इंग्रजी नववर्ष जरी जानेवारीपासून सुरू होत असले तरी चित्रपटसृष्टीचे नववर्ष दिवाळीपासून सुरू होते. दिवाळीत एखाद्या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली की, वर्षअखेरीतील काही दिवस त्यांचे बऱ्यापैकी सुगीचे जातात. अशी हिंदी सिनेसृष्टीतील तज्ज्ञांचे मत आहे. (Marathi Entertainment News)
दिवाळी पुर्वीच्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित केला जात नाही. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून याही वर्षी ही परंपरा कायम पुढे चालत आहे. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी व्यापारीवर्ग चोपडी पुजन करत आपल्या नववर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात करतात. तर चित्रपटसृष्टीतील प्रॉडक्शन हाऊसेसची पुजा बालप्रतिपदेपासून सुरु होते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पुर्वी अनेक चित्रपट निर्माते प्रयत्नशील असायचे आणि अजूनही ते चित्रपट प्रदर्शनासाठी अगदी उत्साहीत असतात. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज निर्मात्यांनी दिवाळीचा शुभमुहूर्त डोळ्यासमोर ठेवत काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. दिवाळीत सुट्टीचा हंगाम जास्त असल्याने त्या काळात चित्रपटांचा बार अधिक उडवला जातो.
शाळेतील विद्यार्थांना उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर सुट्ट््या असल्याने चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकवर्ग वळत नाही. चित्रपटसृष्टीतील गेल्या दशकभरातील इतिहास पाहता चित्रपटांचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. मनोरंजनक्षेत्रासाठी दिवाळी पुर्वीच्या आठवड्यात चित्रपटांची खास कमाई होत नाही. गेल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला एक दोन नाही तब्बल दहा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होता. या सर्व चित्रपटांकडे लो बजेट चित्रपट (Low Budget Movie) म्हणून पाहिले जात आहे. दिवाळीचे औचित्य साधत अजय देवगणचा 'थॅंक गॉड' तर अक्षय कुमारचा 'राम सेतू' हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
यावर्षी ही कोणत्याही मराठी आणि हिंदी निर्मात्याने दिवाळी आधीच्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शन करण्याचे साहस दाखवले नाही. दिवाळीच्या अगोदर चित्रपट प्रदर्शित न करण्याची अंधश्रद्धा निर्मात्यांमध्ये निर्माण झाली आहे याचा प्रत्यय काही चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. दिवाळीच्या पुर्वी प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटाने चांगलाच सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे बरेच चित्रपट निर्माते ऐन दिवाळीचा शुभमुहूर्त साधत चित्रपट प्रदर्शित करतात. भाऊबीजेच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेले दिसत आहे. पण दिवाळी पूर्वीचा आठवडा प्रेक्षकांसाठी नेहमीप्रमाणे या वर्षीही कोरडाच राहिला आहे. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.