kriti sanon
kriti sanon  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kriti Sanon: क्रिती सेननने 'आदिपुरुष'बद्दल मौन सोडले, माध्यमांसमोर भडकली...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kriti Sanon: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 600 कोटींच्या या बिग बजेट चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. क्रिती सध्या तिच्या 'भेडिया' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

चित्रपट 28 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान क्रितीला आदिपुरुष आणि व्हीएफएक्समधील वादांबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्या प्रश्नावर क्रिती पत्रकारांवर चांगलीच भडकली आणि तिने पत्रकारांशी विनाकारण बोलणे बंद केले. एका मुलाखतीदरम्यान क्रिती म्हणाली, टीझरमध्ये जे दाखवले गेले ते खूपच मर्यादित होते.

आतापर्यंत फक्त 1 मिनिट 35 सेकंदाचा टीझर समोर आला आहे. या चित्रपटात अजून बरंच काही आहे. यामध्ये आपल्या इतिहासाची आणि धर्माची नव्या पद्धतीने ओळख करून दिली आहे. 'आदिपुरुष' चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या व्हीएफएक्समुळे अद्यापही हा वाद मिटलेला नाही.

ऑक्टोबरमध्ये अयोध्येत या चित्रपटाचा टीझर भव्य- दिव्य कार्यक्रम करत प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, टीझर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटावर जोरात टीकास्त्र सुरू झाले होते. सोशल मीडियावर लोकांनी हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच फ्लॉप केला होता. या काळात निर्मात्यांकडून विधाने आली आणि त्यांनी सांगितले की, हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहिल्यानंतरच आपले मत मांडावे.

क्रिती सेननला अलीकडेच चित्रपटाच्या CGI आणि VFX सह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर क्रिती म्हणते, चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हा असा चित्रपट आहे ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.

हा भव्य दिव्य असा चित्रपट आहे. तो आपल्या इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याला योग्य मार्गाने बाहेर काढणे आवश्यक आहे कारण त्यानेही तेच पाहिले आहे. सध्या फक्त 1 मिनिट 35 सेकंदाचा टीझर समोर आला आहे, चित्रपटातील बरेच काही काम बाकी असून दिग्दर्शकांनाही चित्रपटावर काम करण्याचे बाकी आहे. त्यामुळे चित्रपटाच्या टीमला चित्रपट प्रदर्शनासाठी अजून काही वेळ हवा आहे.

क्रिती सॅनन पुढे म्हणते, 'आपल्या सर्वांना सर्वोत्कृष्ट चित्रपट द्यायचा आहे कारण आपला इतिहास जाणून घेण्याची, आपल्या धर्माला जागतिक पातळीवर आणण्याची ही संधी आहे. ही एक कथा आहे ज्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे, म्हणून चित्रपटासाठी सर्वोत्तम मार्गाने काम करणे आवश्यक आहे.

मला वाटते की तो आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 ला रिलीज होणार होता पण आता निर्मात्यांनी त्याची प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. आता हा चित्रपट 16 जुन 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

यादरम्यान निर्माते चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम करतील आणि ते अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतील. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT