Shah Rukh Khan Twitter  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: रिटायरमेंट घे... 'जबरा' फॅनच्या अजब सल्ल्यावर 'पठान' शाहरूखचं गजब उत्तर

शाहरुख खान ट्विटरवर 'askSRK' या सेशनद्वारे त्याच्या फॅन्सशी संवाद साधतो.

Pooja Dange

Shah Rukh Khan Retirement: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान 'पठान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुख खान ट्विटरवर 'askSRK' या सेशनद्वारे त्याच्या फॅन्सशी संवाद साधतो. यावेळी त्याचे अनेक फॅन्स त्याला टॅग करून अनेक प्रश्न विचारत असतात. शाहरुख देखील त्यांची खूप मिश्किल उत्तरे देत असतो. यावेळी शाहरुखला एका युजरने प्रश्न न विचारात सल्ला दिला आहे. पाहूया शाहरुखला नेमका काय सल्ला दिला आहे?

शाहरुखचा आगामी चित्रपट 'पठान' डिझास्टर असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने शाहरुखला निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. या युजरला उत्तर देत शाहरुख म्हणाला आहे की, 'मोठ्यांशी असं बोलतात का बाळा!!' त्यावर शुभम दत्त या युजरने रिप्लाय करत म्हटलं आहे की, 'ही झाली न किंग खान वाली बात'. तर रुचीने म्हटले आहे की, 'अशांना असेच उत्तर द्या'.

शाहरुखचे हे सेशन नेहमीच खूप व्हायरल होते. यावेळीही 'askSRK' या सेशनमध्ये शाहरुख खानच्या उत्तराने सर्वांचे मनोरंजन झाले. यावेळी शाहरुखने क्रिकेटर ऋषभ पंतची प्रकृतीत लवकर सुधार व्हावा यासाठी दुआ मागितली आहे.

शाहरुखला ट्विटर १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याबाबत देखील शाहरुखने ट्विट केले आहे. त्याने म्हटले आहे की, माझ्या आता लक्षात आले की, 'मला ट्विटर जॉईन करून येऊन १३ वर्षे झाली आहेत.. इथे तुम्हा सर्वांसोबत राहणे मजेदार होते आणि फॅन क्लबकडून भरपूर प्रेम मिळाले. शुभेच्छा, प्रतिक्रिया, मिम्स, री-एडिट्स, आशा-अपेक्षा, न मागता मिळणारे सल्ले आणि काही अप्रिय व्यवहार, सगळं काही मिळालं. तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा, खऱ्या दुनियेत, तुमचे जीवन अजून चांगले बनवा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT