Aparna Vastarey Passed Away Saam TV
मनोरंजन बातम्या

Aparna Vastarey Passed Away: बिग बॉस फेम अभिनेत्री अपर्णा वस्तारेचं कॅन्सरमुळे निधन

Bigg Boss Fame Aparna Vastarey is No More: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अपर्णा वस्तारे हिचं निधन झाले आहे. गेल्या २ वर्षांपासून अभिनेत्री कर्करोगाशी झुंज देत होती. पण अखेर आज तिची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली.

Chetan Bodke

कन्नड इंडस्ट्रितून एक दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अपर्णा वस्तारे हिचं निधन झाले आहे. गेल्या २ वर्षांपासून अभिनेत्री कर्करोगाशी झुंज देत होती. पण अखेर आज ती झुंज अपयशी ठरली. अभिनेत्रीचं वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनाचे वृत्त तिचे पती नागराज वस्तारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

अभिनेत्रीच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान झाले होते. पण अभिनेत्रीचा हा कॅन्सर चौथ्या स्टेजपर्यंत गेला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आणि रेडिओ जॉकी अपर्णा वस्तारे गेल्या दोन वर्षांपासून फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त होती. बंगळुरू येथील बनशंकरीमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनाने कन्नड सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

५७ वर्षीय अपर्णाच्या निधनाच्या बातमीने तिच्या सेलिब्रिटी मित्रांसह चाहत्यांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कांतारा चित्रपटाचे अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे, "अपर्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली, तिच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती"

ऑक्टोबर १९६६ मध्ये जन्मलेली अपर्णा टिव्ही अभिनेत्री आणि रेडिओ जॉकी आहे. १९८४ मध्ये 'पुत्तन्ना कनगल' या चित्रपटातून कन्नड इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी 'मसानंदा हुवू', 'संग्राम', 'इन्स्पेक्टर विक्रम', 'डॉक्टर कृष्णा' आणि 'ओंटी सलागा' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT